Join us  

IPL Auction 2021 : खूश हुआ 'कॅप्टन कोहली'; पाकिस्तानची झोप उडवणाऱ्या भिडूवर RCBची 'विराट' बोली

IPL Auction 2021 Kyle Jamieson RCB : ऑकलंडच्या या गोलंदाजानं पाकिस्तान संघांचा चांगलाच पाहुणचार घेतला. कसोटी आणि ट्वेंटी-20 मालिकेत त्यानं पाकिस्तानी फलंदाजांची भंबेरी उडवली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 18, 2021 6:57 PM

Open in App

IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १४व्या पर्वात परदेशी खेळाडूंनी कोटींची उड्डाणं घेतली. ख्रिस मॉरीस, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन यांच्यानंतर न्यूझीलंडच्या एका खतरनाक गोलंदाजासाठी चढाओढ पाहायला मिळाली. ६ फुट ८ इंच उंचीच्या या गोलंदाजासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले होते. त्यात फलंदाजीतही त्यानं दमदार कामगिरी करून न्यूझीलंडच्या विजयात हातभार लावला. असा हा अष्टपैलू खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( Royal Challengers Bangalore) ताफ्यात दाखल झाल्यानं कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) खूश झाला असेल. मॅक्सवेल आणि जेमिन्सन ही अष्टपैलू खेळाडूंची जोडी RCBला यंदा तरी जेतेपद पटकावून देईल, असे स्वप्न RCBचे चाहते आतापासूनच पाहू लागले असतील. IPL Auction 2021 Live Today IPL Auction 2021 : १ चेंडूंत १७ धावा देणाऱ्या गोलंदाजासाठी पंजाब किंग्सनं मोजले ८ कोटी!

ऑकलंडच्या या गोलंदाजानं पाकिस्तान संघांचा चांगलाच पाहुणचार घेतला. कसोटी आणि ट्वेंटी-20 मालिकेत त्यानं पाकिस्तानी फलंदाजांची भंबेरी उडवली. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनाही त्यानं शरणागती पत्करण्यास भाग पाडले. पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत त्यानं १६ विकेट्स घेतल्या. व्यावसायिक ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३८ सामन्यांत ५४ विकेट्स आहेत आणि ७ धावांत ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. ७५ लाख मुळ किंमत असलेल्या जेमिन्सनसाठी RCBनं १५ कोटी मोजले. कसोटीमध्ये जेमिन्सनची फलंदाजी सरासरी ५६.५० अशी आहे, तर गोलंदाजी  सरासरी १३.२५ अशी आहे.   IPL Auction 2021 News in Marathi IPL Auction 2021 : शाहरुख खान खेळणार प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सकडून; २० लाखांहून थेट ५.२५ कोटींची भरारी

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ( Most expensive players in IPL Auction history)ख्रिस मॉरिस ( Chris Morris) - 16.25 crore, 2021युवराज सिंग ( Yuvraj Singh) - 16 crore, 2015पॅट कमिन्स ( Pat Cummins ) - 15.5 crore, 2020कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson ) - 15 crore, 2021बेन स्टोक्स ( Ben Stokes ) - 14.5 crore, 2017 

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२१ मिनी ऑक्शनरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीन्यूझीलंड