Join us  

IPL Auction 2021 : ख्रिस मॉरिसनं इतिहास रचला, युवराज सिंगला मागे टाकून सर्वात महाग खेळाडू ठरला

IPL Auction 2021 Chris Morris Most Expensive मुंबई इंडियन्स १३ कोटीपर्यंत मॉरिससाठी उत्सुक होते, परंतु पर्समध्ये कमी पैसे असल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. मॉरिसची बेस प्राईज ७५ लाख इतकी होती. 

By स्वदेश घाणेकर | Published: February 18, 2021 4:10 PM

Open in App

IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूचा मान दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसनं ( Chris Morris) पटकावला. पंजाब किंग्स ( KXIP) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात ख्रिस मॉरिससाठी जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. मॉरिसवर बोली लागण्यापूर्वी ग्लेन मॅक्सवेलसाठी ( Glenn Maxwell) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूनं ( RCB) १४.२५ कोटी मोजले आणि तो सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेला. पण त्यानंतर मॉरिससाठी जबरदस्त चढाओढ पाहायला मिळाली. RCBनं १० कोटी किंमत असलेल्या मॉरिसला या लिलावापूर्वी रिलीज केलं आणि राजस्थान रॉयल्सनं त्याला १६.२५ कोटींत खरेदी केलं. Chris Morris becomes the most expensive player in IPL history, IPL Auction 2021 Sold Players

आयपीएल ऑक्शनमधील महागडे खेळाडू ( Highest purchases in #IPLAuction ) ख्रिस मॉरिस - १६.२५ कोटी ( राजस्थान रॉयल्स २०२१) युवराज सिंग - १६ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स २०१५)  पॅट कमिन्स  १५.५ कोटी ( कोलकाता नाइट रायडर्स, २०२०) बेन स्टोक्स १४.५ कोटी ( रायझिंग पुणे सुपरजायंट्स २०१७)ग्लेन मॅक्सवेल १४.२५ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०२१) युवराज सिंग १४ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  २०१४)  

सर्वात महागडे खेळाडू ( Most expensive foreign players in IPL Auctions) पॅट कमिन्स - १५.५ कोटी, २०२०बेन स्टोक्स - १४.५ कोटी, २०१७ग्लेन मॅक्सवेल - १४.२५ कोटी, २०२१ 

राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) -रिलीज खेळाडू : स्टीव स्मिथ, अंकित राजपूत, ओशेन थॉमस, आकाश सिंह, वरु ण एरॉन, टॉम कुरेन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंह;

रिटेन खेळाडू : संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवितया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, ॲन्ड्रयू टाय जयदेव उनादकट, मयंक मारकंडे, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा आणि रॉबिन उथप्पा;

३४.८५ कोटी रुपये शिल्लक - ५ भारतीय व ३ परदेशी खेळाडूंसाठी जागा रिक्त

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२१ मिनी ऑक्शनरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्स