Join us  

IPL Auction 2021 : अर्जुन तेंडुलकरच्या कौशल्याचं आकाश अंबानीकडून कौतुक; झहीर म्हणतो, तो मेहनती मुलगा!

IPL Auction 2021 : महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) ऑफिशियली मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians) खेळताना दिसेल.

By स्वदेश घाणेकर | Published: February 19, 2021 11:40 AM

Open in App

IPL Auction 2021 : महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) ऑफिशियली मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians) खेळताना दिसेल. चेन्नईत गुरुवारी पार पडलेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सनं  ( MI) त्याला २० लाखांच्या मुळ किंमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. लिलावात सर्वात शेवटी अर्जुनचं नाव घेतलं गेलं आणि मुंबई इंडियन्स या एकमेव संघानं त्याच्यासाठी उत्सुकता दाखवली. मुंबई इंडियन्सचं त्याला संघात घेतील, असा अंदाज सुरुवातीपासूनच व्यक्त केला जातत होता. मागील काही वर्ष तो मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये गोलंदाजी करतोय. फ्रँचायझींनी फिरवली पाठ अन् पुढच्याच दिवशी ११ चेंडूंत ५६ धावा चोपून काढला राग

मुंबई इंडियन्सनं अर्जुनला संघात का घेतलं, याबाबत संघाच्या कोर सदस्यांनी स्पष्ट केलं. मुंबई इंडियन्सचा क्रिकेट ऑपरेशन प्रमुख झहीर खान म्हणाला, ''महान फलंदाजाचा मुलगा हे सत्य अर्जुन नाकारू शकत नाही, परंतु त्याला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. मी नेट्समध्ये त्याच्यासोबत बराच वेळ घालवला आहे आणि त्याला काही ट्रीक्स शिकवण्याचा प्रयत्न केला. तो मेहनती मुलगा आहे आणि तो शिकण्यासाठी तयार असतो. सचिन तेंडुलकर नावामुळे त्याच्यावर प्रचंड दडपण असतं. शेन बाँड व महेला यांच्या मार्गदर्शनाखाली तो अजून परिपक्व होईल. त्याला मी शुभेच्छा देतो.''  तुझा अभिमान वाटतो भावा; अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, सारानं लिहिली पोस्ट...

अर्जुन तेंडुलकरच्या कौशल्याचे MIचे मालक आकाश अंबानी यांच्याकडून कौतुक''अर्जुनकडे कौशल्य आहे. तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि डावखुरा फलंदाजही आहे. जगात असे फार कमी क्रिकेटपटू आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्य युवा खेळाडूंप्रमाणे त्याची प्रगती होत गेली आहे. मुंबई इंडियन्स त्याला आणखी सहकार्य करेल, अर्जुनलाही त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. ज्या प्रकारचे वातावरण मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात आहे, त्याचा अर्जुनला फायदाच होईल. अन्य युवा खेळाडूंप्रमाणे आगामी काळात अर्जुनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल, अशी आशा आहे,''असे आकाश अंबानी म्हणाले.  ख्रिस मॉरिसला १६.२५ कोटी, तरीही सर्वाधिक पगार घेणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानी

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२१ मिनी ऑक्शनअर्जुन तेंडुलकरझहीर खानआकाश अंबानीमुंबई इंडियन्स