Join us  

IPL Auction 2019 : युवराज सिंगचा मुंबई इंडियन्सच्या कर्णधार रोहित शर्मासाठी खास मॅसेज

IPL Auction 2019 : युवराज सिंग याला मुंबई इंडियन्सने मूळ किंमतीत आपल्या चमूत दाखल करून घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 9:58 AM

Open in App
ठळक मुद्देमुंबई इंडियन्सने युवराज सिंगला मूळ किंमतीत आपल्या चमूत दाखल करून घेतले. दुसऱ्या फेरीत एक कोटीत युवराज मुंबईच्या चमूतआयपीएलच्या पुढील सत्रात रोहित - युवराजची जोडी धुमाकूळ घालणार

मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंग याला इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) 2019च्या मोसमासाठी झालेल्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्सने मूळ किंमतीत आपल्या चमूत दाखल करून घेतले. 300 पेक्षा अधिक खेळाडूंचा या लिलाव प्रक्रियेत सहभाग होता आणि त्यापैकी केवळ 70 खेळाडू नशीबवान ठरले. पण, युवराजचे मुंबई इंडियन्स संघात जाणे सर्वांना सुखद करणारे ठरले. पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरलेला युवराज पुढील मोसमात मुंबईच्या जर्सीत आयपीएलमध्ये षटकारांची आतषबाजी करण्यासाठी उत्सुक आहे. या लिलावात एक कोटी मूळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये युवराजचा समावेश होता, परंतु पहिल्या फेरीत आठपैकी एकाही संघाने त्याच्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे युवराजची आयपीएल कारकीर्द धोक्यात येते का असे वाटू लागले, परंतु अंतिम टप्प्यात मुंबई इंडियन्स या एकमेव संघाने त्याच्यासाठी बोली लावली आणि एक कोटीच्या मूळ किमतीत त्याला संघात दाखल करून घेतले. युवराजनेही त्वरित ट्विटरवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला मॅसेज पाठवला. त्यात त्याने लिहिले की,'' मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाचा सदस्य झाल्याचा आनंद आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. रोहित लवकरच भेटू.'' आयपीएलच्या मागील सत्रात युवराज किंग्ज इलेव्हन पंजाबचा सदस्य होता. त्याला केवळ 8 सामन्यांत 65 धावा करता आल्या होत्या.   

टॅग्स :युवराज सिंगआयपीएल लिलाव 2019इंडियन प्रीमिअर लीगआयपीएल लिलावमुंबई इंडियन्स