Join us

IPL Auction 2018: विराट कोहलीला धक्का; 'हा' खास खेळाडू पंजाबच्या संघात दाखल

गेल्या हंगामात कोहलीने ख्रिस गेलला संघात कायम न ठेवता या खेळाडूला संघात स्थान दिले होते. पण या हंगामात मात्र या खेळाडूला कोहलीला गमवावे लागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 17:41 IST

Open in App

मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचा एक खास खेळाडू होता. गेल्या हंगामात कोहलीने ख्रिस गेलला संघात कायम न ठेवता या खेळाडूला संघात स्थान दिले होते. पण या हंगामात मात्र या खेळाडूला कोहलीला गमवावे लागले आहे. कोहलीसाठी हा मोठा धक्का आहे. त्याचबरोबर या खेळाडूचा भावही चांगलाच घसरला असल्याचेही पाहायला मिळाले आहे.

गेल्या वर्षी बंगळुरुच्या संघाने कर्णधार कोहली, ए बी डी' व्हिलियर्स आणि सर्फराझ खान यांना कायम ठेवले होते. सर्फराझसाठी बंगळुरुने गेलला देखील संघाबाहेर काढले होते. त्यावेळी तब्बल 1.75 कोटी रुपये त्याच्यासाठी बंगळुरुने मोजले होते. पण यावेळी पंजाबने त्याला संघात दाखल करून घेताना फक्त 25 लाख रुपयांवर त्याची बोळवण केली आहे. 

टॅग्स :आयपीएलआयपीएल लिलावआयपीएल लिलाव 2019