Join us  

IPL Auction 2018: वडील मजूर, स्वतः शोरूममध्ये गार्डचं काम करायचा मंजूर अहमद, आता प्रीति झिंटाच्या टीममधून खेळणार आयपीएल

काश्मीरच्या एका छोट्याश्या गावातून निघून किंग्स इलेव्हन पंजाबच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहचालयला मंजून अहमद डारने अतिशय मेहनत केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 9:05 AM

Open in App

मुंबई- काश्मीरच्या एका छोट्याश्या गावातून निघून किंग्स इलेव्हन पंजाबच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहचालयला मंजून अहमद डारने अतिशय मेहनत केली आहे. अनेक स्पर्धकांशी स्पर्धा करून आयपीएलपर्यंत पोहचलेल्या डारला प्रीति झिंटाच्या किंग्स इलेव्हन पंजाब या संघाने 20 लाख रूपयाच विकत घेतलं. श्रीनगरमधील एका गाड्यांच्या शोरूममध्ये प्रायव्हेट सिक्युरिटी गार्डचं काम मंजूर अहमद करत होता. आयपीएलसाठी किंग्ज इलेव्हन पंजाब या संघात निवड होणं ही त्याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मंजूर अहमदला मिळालेल्या या प्लॅटफॉर्ममुळे त्याच्या प्रतिमेला नवी ओळख मिळणार आहे. 

आयपीएलमध्ये निवड होणं हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस होता. मला आनंद शब्दात सांगता येण कठीण आहे, अशी भावना मंजूर अहमदने व्यक्त केली आहे.

सुगानपोरा गनास्तान गावात राहणाऱ्या मंजूर अहमदचा क्रिकेटमधील प्रवास खूप प्रेरणादायी आहे. मंजूर गरिबी आणि पक्षपाताशी संघर्ष करून इथपर्यंत पोहचला आहे. राज्य क्रिकेट संघात स्थान मिळविण्यासाठी मी किती संघर्ष केला आहे, हे फक्त मलाच माहिती. माझं आत्तापर्यंतच आयुष्य मी मेहनत करून घालविलं आहे. आज मला जे मिळालं ते माझ्या मेहनतीचं फळ आहे. पैसा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा नाही तर आयपीएलमध्ये निवड होणं, हे महत्त्वाचं असल्याचं मंजूरने म्हंटलं, असंही मंजूरने सांगितलं. 

मंजूरने शाळा सोडल्यामुळे त्याचं शिक्षण अर्धवट राहिलं. भावंडांमध्ये सगळ्यात मोठा असल्याने घरातील आर्थिक तंगी दूर करणं त्याच्यासमोर आव्हान होतं. त्यामुळे त्याने सिक्युरिटी गार्डची नोकरी स्वीकारून घरातील खर्च भागवायला सुरूवात केली. मंजूर अहमद ज्या शोरूममध्ये काम करत होता तेथून शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडिअम दहा किलोमीटर लांब होतं. रात्री सिक्युरिटी गार्डची नोकरी करून मंजूर अहमद सकाळी स्टेडिअममध्ये जायचा. एक वेळ अशीही होती जेव्हा शोरूम ते स्टेडिअम जायला मंजूरकडे पैसे नव्हते. त्याने त्यावेळी चालत प्रवास केला. 

आयपीएलमध्ये मंजूर अहमदची निवड झाल्याने आता काश्मीरमधील इतर खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल. मंजूर तेथे आता सगळ्यांसाठी प्रेरणा बनला आहे.  

टॅग्स :आयपीएल लिलाव 2018आयपीएल 2018किंग्ज इलेव्हन पंजाबक्रिकेट