Join us

IPL 2021: धोनीनं पराभवामागचं कारण सांगितलं, शतकवीर ऋतुराज गायकवाडबाबत केलं मोठं विधान

IPL 2021, CSK vs RR: राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीनं अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. सामन्यात युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीवरही धोनीनं सविस्तर मत व्यक्त केलं. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 10:50 IST

Open in App

IPL 2021, CSK vs RR: आयपीएलमध्ये शनिवारी रात्री चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या सामन्यात सात विकेट्सनं पराभव पत्करावा लागला. चेन्नईचा संघ याआधीच प्ले-ऑफमध्ये पोहोचला असून कालच्या पराभवानंतरही चेन्नईच्या संघाचं गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम आहे. राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीनं अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. सामन्यात युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीवरही धोनीनं सविस्तर मत व्यक्त केलं. 

"सामन्याची नाणेफेक गमावणं आमच्यासाठी महागात ठरलं. तरी १९० धावांचं लक्ष्य खूप चांगलं होतं. पण दुसऱ्या डावात मैदानात दव पडल्याचा फटका आम्हाला बसला. या खेळपट्टीवर चांगली फलंदाजी करण्याची गरज होती आणि ती आम्ही केली. गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात आम्हाला यश आलं होतं. पण त्यांनी पहिल्या ६ षटकांमध्येच आमच्या हातातून सामना खेचून घेतला होता. ज्यापद्धतीनं ते फलंदाजी करत होते ते पाहता २५० धावांचं लक्ष्य त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरलं असतं", असं धोनी मिश्किलपणे म्हणाला. 

धोनीनं ऋतुराज गायकवाडचं यावेळी तोंडभरुन कौतुक केलं. "जेव्हा एखादा फिरकीपटू उत्तम गोलंदाजी करत असतो त्याच्याविरोधात खेळणं आणि मोठं फटके लगावणं खूप कठीण काम असतं. पण ऋतुराजनं मैदानात वाखाणण्याजोगी फलंदाजी केली. जेव्हा तुम्ही सामना गमावता तेव्हा अशा वैयक्तिक खेळी पराभवामागे लपल्या जातात. पण ही एक शानदार खेळी होती", असं धोनी म्हणाला. 

सामन्यात चेन्नईच्या वेगवान गोलंदाज दीपक चहर याची कमतरता भासल्याची कबुली देखील धोनीनं यावेळी दिली. "मला वाटतं फलंदाजांना आता खेळपट्टीचा अंदाज घेत किती स्कोअर करायला हवा हे समजून घ्यावं लागणार आहे. तुम्ही ट्वेन्टी-२० प्रकारात खूप मेहनत घेता आणि तुम्हाला लक्षात येतं की १६०-१८० धावा देखील या खेळपट्टीसाठी पुरेशा नाहीत. प्रतिस्पर्धी संघानं परिस्थितीचं आकलन लवकर केलं आणि मधल्या फळीवर दबाव निर्माण होणार नाही याची काळजी गेतली. दिपकनं सुरुवातीच्या सामन्यांमध्ये नव्या चेंडूनं चांगली गोलंदाजी केली होती. आज आम्हाला त्याची नक्कीच कमतरता भासली. कारण आज खरंतर गोलंदाजांवर जास्त दबाव होता", असं धोनी म्हणाला. 

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स
Open in App