गत IPL विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ शनिवारी (२८ मार्च) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहे. मात्र या उद्घाटन सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का बसला आहे. जलदगती गोलंदाज नुवान थुशारा संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रीलंकेनं बोर्डाने का नाकारली परवानगी?
अलीकडेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंकरिता फिटनेस चाचणी अनिवार्य केली आहे. परदेशी टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी ही चाचणी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. मात्र थुशारा या फिटनेस टेस्टमध्ये आवश्यक निकष पूर्ण करू शकला नाही. त्यामुळेच त्याला IPL मध्ये खेळण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. परिणामी ३१ वर्षीय गोलंदाज सुमारे १.६ कोटींच्या कराराला मुकणार आहे.
शब्दाला जागला हार्दिक पांड्या! वर्ल्ड कपसाठी मदत करणाऱ्या वानखेडेच्या ग्राउंड स्टाफला दिलं 'स्पेशल गिफ्ट'
दुखापतग्रस्त नसतानाही तो फसला! 'या' खेळाडूंना मिळाली परवानगी
थुशारा सध्या दुखापतग्रस्त नसला तरी त्याच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे बोर्डाने कठोर भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे दुष्मंथा चमीरा, दसुन शनाका, पथुम निसंका आणि कंमिंदू मेंडिस यांनी फिटनेस चाचणी पास करून IPL मध्ये खेळण्यासाठी परवानगी मिळवली आहे.
RCB च्या संघाला मोठा धक्का, कारण...
श्रीलंकन स्पीडस्टार थुशाराने आयपीएल २०२५ च्या हंगामात फक्त एकच सामना खेळला आहे ज्यात त्याने एक विकेट घेतली होती. त्याआधी २०२४ च्या हंगामात त्याने ७ सामन्यात ८ विकेट्स मिळवल्या होत्या. जोस हेजलवूड दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. यश दयाल करारबद्ध असला तरी यंदाच्या हंगामात तो खेळणार नाही, हे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत नुवान थुशारा स्पर्धेबाहेर पडणं RCB साठी मोठा धक्काच आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमारसह न्यूझीलंडच्या जेकब डफी, अनकॅप्ड रसिख सलाम आणि अभिनंदन सिंग यांच्यावर या संघाची जलदगती गोलंदाजीची मदार असेल.
या खेळाडूकडूनही असतील मोठ्या अपेक्षा
आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी झालेल्या मिनी लिलावात RCB च्या संघाने आपली कोअर टीम कायम ठेवली असून व्यंकटेश अय्यरच्या रुपात त्यांनी सर्वात मोठी शॉपिंग केली होती. IPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असलेल्या व्यंकटेश अय्यरसाठी RCB नं ७ कोटी मोजले आहेत. केकेआरकडून अपयशी ठरलेला हा हिरो आरसीबीकडून चमकणार का? तेही पाहण्याजोगे असेल.