IPL 2026 Who Is RCB Jacob Duffy Dismissed SRH Abhishek Sharma Travis Head Same Over : गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने (RCB) इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या १९ व्या हंगामाची दमदार सुरुवात केली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या जोश हेजलवूडच्या जागी त्यांनी जेकब डफीला संधी दिली. पहिला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या या पठ्यानं एका षटकात दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडत आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पदार्पणाच्या सामन्यात डफीचा जलवा! SRH च्या आघाडीच्या फलंदाजांनी टाकली नांगी
डफीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातील दुसऱ्याच षटकात SRH चे स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांना बाद केले. अभिषेक शर्मा ८ चेंडूत ७ धावा करुन माघारी फिरला. याच षटकात त्याने ट्रॅविस हेडलाही स्वस्तात माघारी धाडले. यानंतर डफीनं आपल्या स्पेलच्या तिसऱ्या षटकात नितीश कुमारलाही बाद केले. न्यूझीलंडच्या गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात ४ षटकांत फक्त २२ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या.
IPL 2026 : बॅटल ऑफ आयपीएल क्वीन्स! SRH च्या काव्या मारनसमोर RCB च्या नव्या मालकीणीनं लुटली मैफील
कोण आहे जेकब डफी?
३१ वर्षीय जेकब डफी हा न्यूझीलंडचा उजव्या हाताचा जलदगती गोलंदाज आहे. RCB च्या संघाने मिनी लिलावात त्याला २ कोटी या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. डफीला न्यूझीलंडकडून ४८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. ज्यात त्याने ६२ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० मध्ये १४ धावांत ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये १६८ विकेट्स
एप्रिल २०२५ मध्ये आयसीसी टी-२० क्रमवारीत डफी अव्वलस्थानावर पोहचला होता. या ३१ वर्षीय खेळाडूने ४८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात त्याने २०.२५ च्या सरासरीने आणि ८.०८ च्या इकॉनॉमी रेटने ६२ बळी घेतले आहेत, ज्यात पाच वेळा चार बळी घेण्याच्या कामगिरीचा समावेश आहे. त्याच्या एकूण टी२० कारकिर्दीत, त्याने १६८ सामन्यांमध्ये २५.१३ च्या सरासरीने आणि ८.५० च्या इकॉनॉमी रेटने १८९ बळी घेतले आहेत.
न्यूझीलंडकडून एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज
डफी हा अलीकडच्या काळात चांगल्या फॉर्ममध्ये नाही. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने पाच सामन्यात फक्त ५ विकेट्स घेतल्या होत्या. पण गत वर्षी या पठ्ठ्यानं एका कॅलेंडर ईयरमध्ये ८१ विकेट्स घेत खास विक्रमाला गवसणी घातली होती. न्यूझीलंडकडून एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. या कामगिरीसह त्याने भारताच्या झहीर खान (२००७), ब्रेट ली (२००८), शोएब अख्तर (२००२), आर. अश्विन (२०१३), रबाडा (२०१६) यांच्या पंक्तीत स्थान मिळवले होते.
Web Summary : Jacob Duffy shined on his RCB debut, dismissing SRH's Abhishek Sharma and Travis Head in the same over. The Kiwi bowler took 3 wickets for 22 runs, proving his worth after being bought for 2 crore. He holds a record for most wickets in a calendar year for New Zealand.
Web Summary : जेकब डफी ने RCB के लिए पदार्पण करते हुए SRH के अभिषेक शर्मा और ट्रेविस हेड को एक ही ओवर में आउट किया। न्यूजीलैंड के इस गेंदबाज ने 22 रन देकर 3 विकेट लिए। उन्हें 2 करोड़ में खरीदा गया था। उनके नाम न्यूजीलैंड के लिए एक कैलेंडर वर्ष में सबसे अधिक विकेट लेने का रिकॉर्ड है।