Join us
Daily Top 2Weekly Top 5

CSK vs DC : ४ चेंडूत ४ विकेट्स! कपिल पाजींचा विक्रम मोडणाऱ्या Auqib Nabi Dar चं IPL मध्ये पदार्पण

इथं जाणून घेऊयात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या नव्या हिरोचा देशांतर्गत क्रिकेट ते IPL पर्यंतचा प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 20:41 IST

Open in App

IPL 2026  Who is Auqib Nabi Jammu and Kashmir Fast bowler making his debut for DC : जम्मू काश्मीरच्या संघाला रणजी स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत टीम इंडियाचे दरवाजे ठोठावणाऱ्या औकिब नबी दार (Auqib Nabi Dar) याची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला पदार्पणाची संधी दिली. जम्मू काश्मीरच्या जलदगती गोलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली आहे. मिनी लिलावात DC नं या गोलंदाजासाठी तब्बल ८. ४० कोटी एवढी मोठी रक्कम खर्च केली होती. दुलिप करंडक ट्रॉफी स्पर्धेत या पठ्ठ्यानं ४ चेंडूत ४ विकेट्स घेत कपिल पाजींचा विक्रमही मोडूनही सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. इथं जाणून घेऊयात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या नव्या हिरोचा देशांतर्गत क्रिकेट ते IPL पर्यंतचा प्रवास...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

IPL मधील नेट बॉलर ते देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील हिरो

आयपीएल स्पर्धेत तगडी बोली लागण्याआधी  जम्मू काश्मीरच्या २९ वर्षीय जलदगती गोलंदाजाने सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यासारख्या IPL फ्रँचायझी संघासोबत नेट बॉलरच्या रुपात काम केले होते. नबी हा रणजी करंडक २०२५-२६ च्या हंगामात सर्वाधिक ६० विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. दुलीप करंडक स्पर्धेत या पठ्ठ्यानं ४ चेंडूत ४ विकेट्स घेत कपिल देव यांचा विक्रम मोडला होता  १९७९ मध्ये कपिल देव यांनी दुलिप करंडक स्पर्धेतील फायनलमध्ये हॅटट्रिकचा डाव साधला होता. हा विक्रम त्याने मोडला होता.    

IPL 2026 Rising Stars : मुकुल चौधरी ते प्रशांत वीर! एका रात्रीत स्टार झाले 'हे' ५ युवा क्रिकेटर्स

रणजीच्या फायनलमध्ये 'पंजा' अन् खास विक्रम

यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेच्या  अंतिम सामन्यातील पहिल्या डावात त्याने पाच विकेट्सचा डाव साधत खास विक्रमाला गवसणी घातली होती. रणजी स्पर्धेच्या एका हंगामात ६० विकेट्स घेताना त्याने सात वेळा पंजा मारला होता. हा एक विक्रमच आहे. आता आयपीएलमध्ये तो हीच कमाल दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.  

English
हिंदी सारांश
Web Title : Auqib Nabi Dar Debuts in IPL After Breaking Kapil Dev's Record

Web Summary : Jammu and Kashmir's Auqib Nabi Dar, after a stellar Ranji season, debuts for Delhi Capitals in IPL 2026. Known for taking four wickets in four balls in the Duleep Trophy, breaking Kapil Dev's record, he aims to replicate his domestic success.
टॅग्स :आयपीएल २०२६दिल्ली कॅपिटल्सचेन्नई सुपर किंग्स