आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी बहुतांश फ्रेंचायझीं संघांनी सराव शिबिराच्या माध्यमातून तयारी सुरु केली आहे. गत चॅम्पियन RCB संघ बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणाऱ्या SRH विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. यासाठी किंग कोहली लंडनहून भारतात परतला आहे. विराट कोहलीशिवाय अनुभवी गोलंदाज भुनवेश्वर कुमार आणि देवदत्त पडिक्कलही RCB च्या ताफ्यात सामील झाला आहे. RCB फ्रँचायझी संघाने सोशल मीडियाच्या माध्यमातून खास व्हिडिओ शेअर करत खेळाडूंच्या आगमनाची पुष्टी केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट कोहली RCB च्या ताफ्यात
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असलेला विराट कोहली याच्याकडून यंदाही संघाला मोठ्या अपेक्षा असतील. वनडेत त्याचा कमालीचा फॉर्म पाहायला मिळाला होता. विराट कोहलीने आयपीएल २०२६ साठीची तयारी आठवडाभर आधीच सुरू केली होती. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो नेट्समध्ये सराव करताना दिसला. युनायटेड किंगडममधील इनडोअर ट्रेनिंग सुविधेत सराव करताना तो उत्तम टचमध्ये दिसत होता आणि सत्रादरम्यान अनेक दमदार फटके खेळताना पाहायला मिळाले. आता तो भारतात परतला असून यंदाच्या हंगामात तो मोठा धमाका करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
कोहलीची दमदार कामगिरी
विराट कोहीलनं आतापर्यंत २६७ सामन्यांत ८६६१ धावा केल्या आहेत. यात ८ शतके आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे. IPL मध्ये ९००० धावांचा पल्ला गाठणारा पहिला फलंदाज होण्याचा मोठा विक्रम त्याला खुणावत आहे.
भुवीलाही खुणावतोय मोठा विक्रम
‘स्विंग किंग’ म्हणून ओळखला जाणारा भुवनेश्वर कुमारही कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भुवीलाही २०० बळींचा टप्पा पूर्ण करत खास विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. IPL च्या इतिहासात आतापर्यंत फक्त युजवेंद्र चहलनं २०० विकेट्स घेतल्या आहेत. भुवी हा पल्ला गाठणारा पहिला जलदगती गोलंदाज ठरू शकतो. देवदत्त पडिक्कलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार फॉर्म दाखवला आहे. त्यामुळे आरसीबीची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे.