IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?

Ayush Mhatre Bat PBKS vs CSK IPL 2026: मैदानावरील प्रकार पाहून खेळाडू आणि कमेंटेटरही चक्रावून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:00 IST2026-04-04T11:58:18+5:302026-04-04T12:00:31+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 umpire made a big mistake about Ayush Mhatre All are shocked bat gauge was upside down | IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?

IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?

Ayush Mhatre Bat PBKS vs CSK IPL 2026: मध्ये शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात झालेल्या सामन्यात एक अतिशय विचित्र आणि मजेशीर घटना घडली. मैदानावरील अंपायरकडून झालेल्या एका मोठ्या चुकीमुळे चेन्नईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे याची बॅट चक्क दोनवेळा अपात्र ठरवण्यात आली होती. त्यामुळे काही काळ मैदानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पण काही काळाने गोष्टी सुरळीत झाल्या.

अंपायरकडून काय चूक घडली?

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) जेव्हा आयुष म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, तेव्हा नियमानुसार अंपायरनी त्याच्या बॅटची जाडी तपासण्यास सुरुवात केली. यासाठी 'बॅट गेज'चा (बॅटची जाडी मोजण्याचे साधन) वापर केला जातो. आयुषची बॅट पहिल्या वेळी त्यातून पार होऊ शकली नाही, बॅट अपात्र असल्याचे सांगितले. ती बॅट बाद ठरवण्यात आल्यावर आयुष म्हात्रेने दुसरी बॅट मागवली, पण अंपायरने पुन्हा ती बॅटदेखील बाद केली.

अखेर चूक लक्षात आली

दोन वेळा दोन बॅट अपात्र ठरल्यानंतर खेळाडू आणि कमेंटेटरही चक्रावून गेले. मात्र, काही सेकंदातच अंपायरला आपली चूक उमजली. अंपायरने बॅट गेज चुकून उलटे धरले होते. त्यांना चूक समजल्यावर त्यांनी गेज फिरवून सरळ धरले, तेव्हा पहिली बॅट सहजपणे त्यातून आरपार झाली. हे पाहून समालोचन करणारे इयान बिशप आणि मायकल क्लार्क यांनाही हसू आवरले नाही. आयपीएलच्या या हंगामात बॅट टेस्टवरून अनेकदा चर्चा झाली असली, तरी अंपायरच्या या चुकीमुळे हा क्षण सोशल मीडियावर 'कॉमेडी ऑफ एरर्स' म्हणून चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या घटनेवर मजेशीर प्रतिक्रिया देत अंपायरिंगच्या दर्जावरही मिश्किल टिप्पणी केली आहे.

आयुष म्हात्रेची तुफानी फलंदाजी

या गोंधळानंतर आयुष म्हात्रेने आपल्या खेळाने घडलेल्या प्रकारावर उत्तर दिले. त्याने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत ४३ चेंडूत ७३ धावांची स्फोटक खेळी साकारली. यामध्ये त्याने ५ उत्तुंग षटकार आणि ६ चौकार ठोकले. संजू सॅमसन स्वस्तात बाद झाल्यानंतर म्हात्रेने डावाची सूत्रे हाती घेत चेन्नईला मजबूत स्थितीत नेले.

 

Web Title : आईपीएल 2026: अंपायर की गलती से सब हैरान, आयुष म्हात्रे का बल्ला दो बार खारिज!

Web Summary : आईपीएल 2026 में, सीएसके बनाम पीबीकेएस मैच के दौरान अंपायर ने गलती से आयुष म्हात्रे के बल्ले को दो बार खारिज कर दिया। अंपायर ने बैट गेज का गलत इस्तेमाल किया, जिससे भ्रम पैदा हो गया। म्हात्रे ने 43 गेंदों में 73 रनों की तूफानी पारी खेली।

Web Title : IPL 2026: Umpire's error bewilders all, Ayush Mhatre's bat rejected twice!

Web Summary : In IPL 2026, an umpire mistakenly rejected Ayush Mhatre's bat twice during the CSK vs PBKS match. The umpire used the bat gauge incorrectly, causing confusion. Mhatre responded with a blistering 73 off 43 balls.