IPL 2026 Trade Updates Kavya Marans Sunrisers Hyderabad Dump Mohammed Shami : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाआधी होणाऱ्या मिनी लिलावाआधी सर्व १० फ्रँचायझी संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत रिटेन्शन यादी बीसीसीआयकडे सोपवायची आहे. त्याआधी काही फ्रँचाययझी संघ ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंच्या अदला बदलीच्या खेळात सहभागी झाले आहेत. गत हंगामात काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या मोहम्मद शमीवर दोन फ्रँचायझीच्या नजरा असल्याची गोष्ट चर्चेत आहे. जर ही डील झाली तर काव्या मारनचा संघासाठी तो फायद्याचा सौदा ठरू शकतो. जाणून घेऊयात त्यासंदर्भात सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काव्या मारनचा SRH संघ कसा उचलू शकतो या डीलचा फायदा?
क्रिकबझच्या वृत्तानुसार, लखनौ सुपर जाएंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोन फ्रँचायझी संघ मोहम्मद शमीला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी इच्छुक आहेत. हा ट्रेड पैशांच्या स्वरुपात होईल, असेही बोलले जाते. त्यामुळे शमीच्या बदल्यात SRH च्या संघाला बदली खेळाडू द्यावा लागणार नाही. त्याच्या बदल्यात मिळालेला पैसा वापरून काव्या मारनच्या मालकीचा संघ मिनी लिलावात एक चांगला डाव खेळण्याची संधी निर्माण होईल.
IPL 2026 : जड्डूसाठी RR आजमावणार MI चा 'हार्दिक' पॅटर्न; यशस्वीच्या नाराजीचाही प्रश्नही मिटला?
१० कोटी मोजले, पण शमीनं त्याची अपेक्षित परतफेड नाही केली
मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादच्या संघान मोहम्मद शमीसाठी १० कोटी रुपये मोजले होते. पण शमीची कामगिरी काही खास राहिली नाही. २०२५ च्या हंगामात शमीनं फक्त ६ विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर शमी सध्या टीम इंडियात एन्ट्री मिळवण्यासाठीही संघर्ष करत आहे. या परिस्थितीत त्याला संघात कायम ठेवण्यापेक्षा सनरायझर्स हैदराबाद ट्रेड डीलच्या माध्यमातून नवी चाल खेळण्याला पसंती देणार का? ते पाहण्याजोगे असेल.
मोहम्मद शमी आयपीएल करिअर
मोहम्मद शमीनं २०१३ पासून आतापर्यंत आयपीएलमध्ये ११९ सामन्यात १३३ विकेट्स घेतल्या आहेत. २०२२ आणि २०२३ च्या हंगामात त्याने आपल्या गोलंदाजीतील खरी धार दाखवून दिली होती. दोन्ही हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने अनुक्रमे २० आणि २८ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.