IPL 2026 SRHs Record Highest Innings Totals And Also For Most 250 Run Totals In IPL : छोट्या फॉरमॅटमधील क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाजीचा थरार नेहमीच चर्चेत असतो. फलंदाजांच्या बॅटमधून पाहायला मिळणारी षटकार-चौकारांची आतषबाजी चाहत्यांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरते. वादळी खेळीनं प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवणाऱ्या संघांमध्ये काव्या मारनच्या मालकीची ‘ऑरेंज आर्मी’ म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद सध्या आघाडीवर दिसते. आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामातील सलामीच्या सामन्यात हैदराबादचा संघ हा रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध भिडणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
३०० धावा करण्याची धमक असणारा संघ
आयपीएलच्या सुरुवातीला गोलंदाजीसाठी ओळख असलेला हा संघ मागील दोन हंगामात स्फोटक फलंदाजीच्या जोरावर वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. आता हा संघ मैदानात उतरला की, ३०० धावांचा टप्पा गाठण्याची चर्चा रंगते. चला तर जाणून घेऊयात SRH संदर्भात ही चर्चा रंगण्यामागचं कारण...
IPL 2026 : पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकायला १८ वर्षे लागली! आता RCB ला खुणावतोय CSK अन् MI चा महारेकॉर्ड
SRH संघाच्या नावे आहे IPL मधील सर्वाच्च धावसंख्येचा रेकॉर्ड
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा सनरायझर्स हैदराबादच्या नावे आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने २०२४ च्या हंगामात एम. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघासमोर २८७ धावांचा डोंगर उभारला होता.
सर्वाधिक वेळा २५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम
जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीगमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारण्याशिवाय सर्वाधिक वेळा २५० पेक्षा अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा SRH संघाच्या नावे आहे. आतापर्यंतच्या इतिहासात १२ वेळा आयपीएल फ्रँचायझी संघांनी २५० पेक्षा अधिक धावा केल्याचे पाहायला मिळाले आहे. यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ५ वेळा हा डाव साधला आहे. याव्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांनी दोन वेळा तर दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जाएंट्स या संघांनी प्रत्येकी एकदा हा डाव साधला आहे. कमालीची गोष्ट म्हणजे IPL स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचे नाव या यादीत दिसत नाही.
या तिघांना रोखणं सर्वात मोठं चॅलेंज, त्यांना आवरलं तरी...
सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी इतर कोणत्याही संघापेक्षा अधिक मजबूत आहे. ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा या डावखुऱ्या फलंदाजांमध्ये संघाला वादळी सुरुवात करुन देण्याची क्षमता आहे. यंदाच्या हंगामात कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर पडलेला ईशान किशनही काही कमी नाही. त्यामुळे एक गेला तरी दुसरा त्याहून धोकादायक... असं काहीसं चित्र SRH च्या बॅटिंग ऑर्डरमध्ये दिसते. लोअर मिडल ऑर्डरमध्ये हॅन्री क्लासेनचा क्लास अन् लायम लिविंगस्टोनचा तडाखाही सहन करावा लागू शकतो. हीच गोष्ट SRH च्या संघाची जमेची बाजू ठरते. या पॉवर पॅकच्या जोरावर ते यंदा ३०० पार धावसंख्येचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.