Join us
Daily Top 2Weekly Top 5

SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे

दोन्ही जलदगती गोलंदाजांनी पदार्पणातील सामन्यात प्रत्येकी ४-४ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 23:21 IST

Open in App

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, 21st Match Result : सनरायझर्स हैदराबादच्या संघाने प्रफुल हिंगे आणि साकिब हूसेन या दोन रायझिंग स्टारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर  राजस्थान रॉयल्सच्या धुरंधरांना रोखत IPL मधील आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. हैदराबादच्या संघाकडून पदार्पण करणाऱ्या दोन्ही जलदगती गोलंदाजांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ईशान किशन आणि क्लासेनच्या जोरावर निर्धारित २० षटकात ६ बाद २१६ धावा करत राजस्थानसमोर २१७ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा संघ १९ षटकांत १५९ धावांवर आटोपला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दो भाई दोनों तबाही...  ९ धावांत RR चा अर्धा संघ तंबूत 

सनराय़झर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या २१७ धावांचा पाठलाग करताना तगडी फलंदाजी असलेला RR संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. IPL मध्ये पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या विदर्भकर प्रफुल हिंगे याने पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर वैभव सूर्यवंशी याला खातेही न उघडता माघारी धाडले. याच षटकात त्याने ध्रुव जुरेल आणि लुआन-ड्रे प्रीटोरियस या दोघांनाही शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला.  पहिल्या षटकात फक्त एक धाव देत त्याने पहिल्याच षटकात राजस्थानच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. याशिवाय रियान परागची विकेटही प्रफुलनेच घेतली. यशस्वी जैस्वालच्या रूपात साकिब हूसेन याने IPL मध्ये विकेटच खाते उघडले. या दोघांनी पहिल्या ३ षटकात राजस्थान रॉयल्सची अवस्था ५ बाद ९ धावा अशी बिकट केली.  

SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे

जड्डू-डोनोव्हन फरेराची शतकी भागीदारी, पण तरीही RR कमी पडली

अर्धा संघ अवघ्या ९ धावांवर तंबूत परतल्यावर रवींद्र जडेजा आणि डोनोव्हन फरेरा ही जोडी जमली. सहाव्या विकेटसाठी दोघांनी ७२ चेंडूत ११८ धावांची दमदार भागीदारी रचली. साकिकबनं ही जोडी फोडली. त्याने डोनोव्हन फरेराच्या खेळीला ६९ धावांवर ब्रेक लावला. इशान मलिंगाने जड्डूचा खेळ ४५ धावांवर खल्लास केला. ही जोडी परतल्यावर पुन्हा विकेटचा सिलसिला सुरु झाला. राजस्थान रॉयल्सचा संघ १५९ धावांवर ऑलआउट झाला.

ईशान किशनचा शानदार शो अन् क्लासेनची क्लास इनिंग

पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माची विकेट गमावली. त्यानतर ट्रॅविस हेडनंही १८ धावा काढून मैदान सोडले. त्यानंतर ईशान किशन याने ४४ चेंडूत ९१ धावांची दमदार खेळी केली. याशिवाय हेन्री क्लासेन याने २६ चेंडूत ४० धावांची खेळी केली. नितीश कुमार रेड्डीनं १३ चेंडूत केलेल्या २८ धावा आणि सलिल अरोराच्या १३ चेंडूतील नाबाद २४ धावांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादच्या संघाने मोठी धावसंख्या उभारली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरनं सर्वाधिक २ तर संदीप शर्मा, तुषार देशपांडे आणि रियान पराग यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : SRH's Triumphant Victory: Rising Stars Humble Rajasthan Royals' Veterans.

Web Summary : Sunrisers Hyderabad defeated Rajasthan Royals, securing their second IPL win. Hinge and Hussain, debutant bowlers, took 4 wickets each. Hyderabad set a target of 217, scoring 216/6 led by Kishan and Klassen. Rajasthan was all out for 159 in 19 overs.
टॅग्स :आयपीएल २०२६सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सइशान किशन