Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद

ईशानचं शतक हुकलं, पण वैभव सूर्यवंशीला ओव्हरटेक करण्याचा डाव साधला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 21:22 IST

Open in App

IPL 2026 SRH vs RR Ishan Kishan Miss Well Deserved Century : हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमधील २१ वा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या  सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायझर्स संघाला जोफ्रा आर्चरने पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का दिला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाल्यावर काव्या मारनचा चेहराच पडला. "अभिषेक तुने क्या किया.." अशीच काहीशी रिॲक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. पण त्यानंतर ईशान किशन याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध शानदार खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. त्याचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकले. पण वैभव सूर्यवंशीला ओव्हरटेक करणाऱ्या खेळीवर SRH ची मालकीण पुन्हा पिक्चरमध्ये आली. तिने ईशानच्या शानदार खेळीला स्टँडिग ओवेशनसह दाद दिल्याचे पाहाला मिळाले. 

ईशानचं शतक हुकलं, पण वैभव सूर्यवंशीला ओव्हरटेक करण्याचा डाव साधला

ईशान किशन याने गत हंगामात सरायझर्स हैदराबादच्या संघाकडून नव्या इनिंगची सुरुवात करताना राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातच IPL कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. यंदाच्या हंगामातही तो शतकाच्या दिशेनं वाटचाल करत होता. राजस्थान विरुद्ध त्याच्या भात्यातून IPL मधील दुसरे शतक पाहायला मिळेल, असे वाटत असताना संदीप शर्माने त्याच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. पण नव्वदीच्या घरात पोहचताच त्याने वैभव सूर्यवंशीला ओव्हरटेक केले. राजस्थान विरुद्ध कर्णधाला साजेशी कामगिरी करताना त्याने ४४ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९१ धावांची दमदार खेळी केली.  यंदाच्या हंगामात सर्वाच्च धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो वैभव सूर्यवंशीला ओव्हरटेक करत तिसऱ्या स्थानावर पोहचला. वैभव सूर्यवंशीनं रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध ७८ धावांची खेळी केली होती.   

SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे

यंदाच्या हंगामात सर्वोच्च धावसंख्या करणारे फलंदाज

  • सजू सॅमसन (चेन्नई सुपर किंग्स) ११५ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • लोकेश राहुल (दिल्ली कॅपिटल्स) ९२ धावा विरुद्ध गुजरात टायटन्स
  • ईशान किशन (सनरायझर्स हैदराबाद) ९१ धावा विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • समीर रिझवी (दिल्ली कॅपिटल्स) ९० धावा विरुद्ध मुंबई इंडियन्स
English
हिंदी सारांश
Web Title : Ishan's brilliant innings overshadowed Suryavanshi; Kavya Maran's enthusiastic appreciation.

Web Summary : Ishan Kishan's stunning 91 against RR propelled SRH. He surpassed Suryavanshi's score, earning praise from owner Kavya Maran. Despite missing century, his knock boosted SRH.
टॅग्स :आयपीएल २०२६सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सइशान किशनवैभव सूर्यवंशीकाव्या मारन