Join us
Daily Top 2Weekly Top 5

Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...

 वैभव सूर्यवंशीला पहिल्या चेंडूवर आउट करेन हे आधीच सांगितले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 00:49 IST

Open in App

How Praful Hinge planned Vaibhav Suryavanshi’s wicket before IPL debut : विदर्भकर प्रफुल हिंगे याने ऐतिहासिक पदार्पणासह सनरायझर्स हैदराबादच्या संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. २१६ धावांचा बचाव करताना पहिल्या दोन षटकात ७ धावा खर्च करताना ४ विकेट्स घेणाऱ्या  प्रफुल हिंगेनं पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लुआन-ड्रे प्रीटोरियस यांची विकेट घेत आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात पदार्पणातील पहिल्या षटकात ३ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. याशिवाय त्याने रियान परागलाही स्वस्तात माघारी धाडले. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मॅचनंतर पुरस्कार स्विकारताना अशा प्रकारे पदार्पण करण्याचा विचार केला होतास का? असा प्रश्न विचारला. यावळी त्याने वैभव सूर्यवंशीची विकेट घेण्यापासून ते अगदी चार विकेट्सचा डाव साधण्यापर्यंत सर्व गोष्टी आधीच मनात ठरवल्या होत्या, असे सांगितले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 वैभव सूर्यवंशीला पहिल्या चेंडूवर आउट करेन हे आधीच सांगितले होते

तो म्हणाला की, हो मी अशाच पद्धतीने पदार्पण करण्याचा विचार केला होता. मागील वर्षी मी कुठेतरी लिहून ठेवले होते की, IPL पदार्पणात मला ४-५ विकेट्स घ्यायच्या आहेत. पॉवरप्लेमध्ये शक्य तितकं वर्चस्व गाजवायचं. मी स्वतःवर विश्वास ठेवतो. यावेळी त्याने वैभव सूर्यवंशीची विकेट ठरवून काढली, ही गोष्टही बोलून दाखवली. तो म्हणाला की, वैभव सूर्यवंशी हा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. मी माझ्या जवळच्या मंडळींना सांगितलं होतं की, मी पहिल्या चेंडूवरच त्याची विकेट घेईन.

Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास

क्रिकेटच्या प्रवासाबद्दल काय म्हणाला प्रफुल हिंगे?

आपल्या क्रिकेट प्रवासाबद्दल प्रफुल हिंगे म्हणाला की, मी १३ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी मला लेदर-बॉल क्रिकेट काय असतं हेही माहिती नव्हतं. टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी क्लबमध्ये जाण्याची इच्छा वडिलांना बोलून दाखवली. सुरुवातीला त्यांनी अजून छोटा आहेस, असे सांगत नकार दिला. पण त्यानंतर मात्र त्यांनी माझ्यावर भरवसा ठेवला. आता इथं येऊन छान वाटले. माझ्या प्रवासात कुटुंबियांचा मोठा वाटा आहे, सामनावीर पुरस्कार कुटुंबियाला समर्पित करतो, असेही तो म्हणाला. याशिवाय त्याने SRH गोलंदाजी प्रशिक्षक वरुण एरॉन यांचेही आभार मानले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Praful Hinge's dream debut: Vaibhav Suryavanshi's wicket planned!

Web Summary : Praful Hinge's stellar IPL debut included taking four wickets, including Vaibhav Suryavanshi's. He had pre-planned Suryavanshi's dismissal and dreamt of this performance. He dedicates his award to his family.
टॅग्स :आयपीएल २०२६सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सइंडियन प्रीमिअर लीग