SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ

रिषभ पंतच्या भात्यातून आलेली नाबाद अर्धशतकी खेळी लखनौच्या संघाला मोठा दिलासा देणारी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 19:39 IST2026-04-05T19:36:38+5:302026-04-05T19:39:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 SRH vs LSG Rishabh Pant Unbeaten Fifty Lucknow Super Giants Won By 5 Wkts Agianst Sunrisers Hyderabad | SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ

SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ

IPL 2026 Lucknow Super Giants Won By 5 Wkts Agianst Sunrisers Hyderabad : रिषभ पंतच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानात ५ विकेट्सनी पराभूत करत यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करताना मोहम्मद शमीसह प्रिन्स यादव आणि आवेश खान यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर लखनौच्या संघाने तगडी फलंदाजी असलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाला १५६ धावांवर रोखले होते. या धावांचा पाठलाग करताना एडन मार्करम याने २७ चेंडूत ४५ धावांची दमदार खेळी केल्यावर कर्णधार रिषभ पंत याने नाबाद ६८ धावांची खेळी केली.  त्यानेच खणखणीत चौकारासह संघाला पहिला विजय मिळवून दिला.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मार्करमची आक्रमक खेळी; पंतनं नाबाद अर्धशतकासह खणखणीत चौकार मारत जिंकून दिला सामना

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या १५७ धावांचा पाठलाग करताना अवघ्या ३७ धावांवर मिचेल मार्शच्या रुपात इशान मलिंगा याने लखनौच्या संघाला पहिला धक्का  दिला. पहिली विकेट स्वस्तात गमावल्यावर मार्करम रिषभ पंत जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २८ चेंडूत ४० धावांची भागीदारी रचली.  अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या मार्रमच्या खळीला शिवांग कुमार याने ४५ धावांवर ब्रेक लावला. एका बाजूने विकेट पडत असताना रिषभ पंत याने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. शेवटपर्यंत मैदानात थांबत लखनौच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केला. अखेरच्या षटकात ९ धावांची गरज असताना ईशान किशन याने जयदेव उनाटकट याच्याकडे चेंडू सोपवला. या षटकात पंतने तीन चौकार मारले.  माफक धावसंख्येचा बचाव करताना सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून हर्ष दुबे याने ४ षटकात फक्त १८ धावा खर्च करत सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय इशान मलिंग आणि शिवांग कुमार यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल

पंतच्या कडक फिफ्टीसमोर दोघांची खेळी ठरली व्यर्थ

पहिल्यांदा फलंदाजी करताना आघाडीच्या फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर  नितीश कुमार रेड्डीनं ३३ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५६ धावांची उपयुक्त खेळी आणि क्लासेन याने ४१ चेंडूचा सामना करताना ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने केलेल्या ६२ धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदाराबादचा संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १५६ धावा केल्या होत्या. पण पंतच्या अर्धशतकामुळे या दोघांची खेळी व्यर्थ ठरली.  लखनौच्या संघाकडून गोलंदाजीत मोहम्मद शमी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत फक्त ९ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या. याशिवाय प्रिन्स यादव आणि आवेश खान यांनी प्रत्येकी २-२ तर दिग्वेश राठी आणि मणिमरन सिद्धार्थ  यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.

 

Web Title : रिषभ की कप्तानी! लखनऊ ने हैदराबाद को हराकर पहली जीत दर्ज की

Web Summary : लखनऊ सुपर जायंट्स ने सनराइजर्स हैदराबाद को 5 विकेट से हराया, अपनी पहली जीत हासिल की। रिषभ पंत के नाबाद अर्धशतक ने हैदराबाद को 156 पर रोकने के बाद लक्ष्य का पीछा किया। मार्करम के 45 और पंत के 68 रनों ने चौके से जीत सुनिश्चित की।

Web Title : Rishabh's Captaincy! Lucknow Defeats Hyderabad for First IPL Win

Web Summary : Lucknow Super Giants defeated Sunrisers Hyderabad by 5 wickets, securing their first win. Rishabh Pant's unbeaten half-century led the chase after Lucknow's bowlers restricted Hyderabad to 156. Markram's 45 and Pant's 68 sealed the victory with a boundary.