हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दहावा सामना रंगला आहे. या सामन्यात LSG चा कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत मोहम्मद शमीनं आपल्या माजी संघाविरुद्ध अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आपल्या स्पेलमधील पहिल्या दोन षटकात अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड या दोन्ही सलामीवीरांचा करेक्ट कार्यक्रम करत सनरायझर्स हैदराबादच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
Ex टीम विरुद्ध शमीचा जलवा! दोन षटकात दोन्ही सलामीवीरांना दाखवला तंबूचा रस्ता
गत हंगामात शमी हा सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात होता. मात्र मिनी लिलावाआधी ट्रेड डीलद्वारे काव्या मारनच्या संघाने त्याला लखनौमध्ये पाठवले. आता त्याच शमीनं Ex टीम विरुद्ध घातक स्पेल टाकत हैदराबादच्या फलंदाजीला अक्षरशः सुरुंग लावल्याचं पाहायला मिळालं. पहिल्याच षटकात एक धाव खर्च करताना शमीनं अखेरच्या चेंडूवर अभिषेक शर्माला खातेही न उघडता माघारी धाडले. अभिषेक शर्माने आतापर्यंत ६ डावात शमीच्या २६ चेंडूचा सामना करताना फक्त २६ धावा केल्या असून दुसऱ्यांदा तो शमीचा शिकार झाला. हैदराबादच्या डावातील तिसऱ्या आणि आपल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर शमीनं ट्रॅविस हेडला तंबूचा रस्ता दाखवला. तो फक्त ७ धावांची भर घालून माघारी फिरला.
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
पॉवर प्लेमध्ये शमीनं साधला खास विक्रमी डाव
लखनौच्या संघाकडून सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीतील धार दाखून देताना मोहम्मद शमीनं खास विक्रमला गवसणी घातली. IPL च्या २०२३ च्या हंगामापासून पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमीनं भुवनेश्वर कुमारच्या विक्रमाशी बरोबरीचा डाव साधला. दोघांनीही प्रत्येकी २५-२५ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. या यादीत ट्रेंट बोल्ट ३२ विकेट्स घेत अव्वलस्थानी आहे.