IPL 2026 SRH vs LSG 10th Match Live Streaming : आयपीएल २०२६ स्पर्धेतील रविवारी होणाऱ्या डबल-हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगणार आहे. दुपारच्या सत्रातीली ही लढत हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
SRH संघाने बॅटिंगसह गोलंदाजीतही सोडलीये छाप
सनरायझर्स हैदराबादचा संघ सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. सलामीच्या लढतीतील पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्यांनी दमदार कमबॅक केले आहे. यंदाच्या हंगामात धावांचा बचाव करताना विजय मिळवणारा सनरायझर्स हैदराबाद हा पहिला संघ ठरला. अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड आणि हेन्री क्लासेन यांच्या खेळीच्या जोरावर त्यांच्या बॅटिंमधील क्लास आणि गोलंदाजीत जयदेव उनाडकट, इशान मलिंगा आणि नितीश कुमार यांनी सोडलेली छाप संघाचे बॅटिंग बॉलिंगमधील कमालीचे संतुलन दाखवणारे होते.
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
LSG चा संघासमोर कमबॅकच चॅलेंज
दुसरीकडे लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. कर्णधार रिषभ पंतसह मिचेल मार्श, निकोलस पूरन अपयशी ठरल्यामुळे दिल्लीच्या संघाविरुद्ध घरच्या मैदानात LSG चा संघ १४१ धावांत आटोपला होता. या पराभवातून सावरून कमबॅक करण्याचे चॅलेंज लखनौच्या नवाबांसमोर असेल.
कधी आणि कुठे रंगणार सामना?
- सामन्याची तारीख : रविवार, ५ एप्रिल २०२६
- सामन्याची वेळ: दुपारी ३ वाजून ३० मिनिटे
- सामन्याचे ठिकाण : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमय, हैदराबाद
कुठे पाहता येईल SRH vs LSG यांच्यातील सामना?
- जिओहॉटस्टार ॲप /वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग
- स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल्सवर थेट प्रसारण
सनरायझर्स हैदराबाद (SRH) संभाव्य प्लेइंग इलेव्हन
ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन (कर्णधार/ यष्टीरक्षक), हेन्री क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, लियाम लिविंगस्टोन, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा.
लखनौ सुपर जाएंट्स (LSG) संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मिचेल मार्श, एडन मार्करम, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, मोहम्मद शमी, आवेश खान, मयंक यादव, एनरिक नॉर्टजे, दिग्वेश राठी.