IPL 2026 Spencer Johnson Joins CSK As A Replacement : चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने यंदाच्या हंगामासाठी दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन एलिसच्या जागी बदली खेळाडू शोधला आहे. CSK फ्रँचायझी संघाने ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन याला आपल्या संघात सामील करून घेतलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बदली खेळाडूसाठी CSK नं किती कोटी मोजले?
IPL 2026 च्या हंगामासाठी CSK च्या संघाने या गोलंदाजासाठी १.५ कोटी रुपयांत डील फायनल केली आहे. जॉन्सनला IPL खेळण्याचा अनुभव आहे. सीएसकेत येण्यापूर्वी तो गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा भाग राहिला आहे. IPL मध्ये दोन फ्रँचायझीकडून मिळून त्याने आतापर्यंत ९ सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत. स्पेन्सर जॉन्सन हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाकडूनही खेळला आहे. १३ आंतरराष्ट्रीय सामन्यात (५ वनडे आणि ८ टी-२०) त्याच्या खात्यात १८ विकेट्स जमा आहेत.
IPL 2026 : काव्या मारनची कॅप्टन्सीची चॉईस अन् पुन्हा जुळून आला 'हा' कमालीचा योगायोग
एलिसपेक्षा कमी अनुभव असणारा गडी प्रभावी ठरणार का?
नॅथन एलिस हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. सीएसकेने त्याला २ कोटी रुपयांना संघात घेतले होते. एलिसने IPL मध्ये १७ सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट ८.६७ राहिला आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी १७ वनडे आणि ३६ टी-२० सामनेही खेळले आहेत. एलिसच्या तुलनेत अल्प अनुभव असणारा स्पेन्सर जॉन्सन सीएसकेसाठी प्रभावी कामगिरी करुन CSK संघ व्यवस्थापनाने दाखवलेला भरवसा सार्थ ठरवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
मोठ्या बदलासह मैदानात उतरणार आहे CSK
पाच वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघासाठी मागील हंगामत खूपच खराब राहिला होता. यंदाच्या हंगामात दमदार कमबॅक करण्यासाठी CSK संघाने युवा खेळाडूंवर भरवसा दाखवला आहे. मोठे बदल केल्यावर संघ पुन्हा पटरीव येणार का? त्यावर सर्वांच्या नजरा असतील. आयपीएल मिनी लिलावात तगड्या युवा खेळाडूंवर बोली लावण्याआधी संजू सॅमसनच्या रुपात CSK नं मेगा ट्रेड डील केली होती. याचाही संघाला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.