चेज मास्टर विराट कोहलीनं टी-२० क्रिकेटमध्ये अगदी धमाकेदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळीसह त्याने RCB च्या संघाला विक्रमी विजय मिळवून दिला. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना दिलेल्या २०२ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने १५.४ षटकात सामना संपवला. २०० पेक्षा अधिक धावांचा सर्वात जलदगतीने पाठलाग करण्याचा खास विक्रम आता RCB च्या नावे झाला आहे. या सामन्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यात एकमेकांवर प्रेमाची उधळण करण्याचा खेळ रंगल्याचे पाहायला मिळाले. या क्षणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
... सामन्यानंतर पाहायला मिळली विरुष्काच्या प्रेमाची खास झलक
RCB तील माजी सहकारी आणि टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज हर्षल पटेल घेऊन आलेल्या १५ व्या षटकाची सुरुवात विराट कोहलीनं षटकाराने केली. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूवर चौकारांची हॅट्रिक करत किंग कोहलीनं RCB चा विजय निश्चित केला. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन केल्यावर पॅव्हेलियनकडे परतत असताना कोहलीनं RCB च्या चाहत्यांकडे बॅट उंचावत अभिवादन केले. त्यानंतर विराट कोहलीनं स्टँडमध्ये उपस्थितीत अनुष्काला चक्क फ्लाइंग किस दिला. तिनेही क्षणाचाही विलंब न करता त्याला फ्लाइंग किस देत रिप्लाय दिला.
RCB विजयानंतर अनन्या बिर्लानं ‘धुरंधर’ गाणं वाजवलं; काव्या मारनला टोमणा? सोशल मीडियावर रंगली चर्चा
टीम इंडियाची क्विन स्मृती मानधनाची रिअॅक्शन व्हायरल
विराटचा प्रेम व्यक्त करण्याचा हा अंदाज पाहून अनुष्काच्या शेजारी बसून मॅचचा आनंद घेणारी टीम इंडियाची क्वीन आणि आरसीबी महिला संघाची कर्णधार स्मृती मानधनाही आश्चर्यचिकत झाली. एम. चिन्नास्वामी मैदानात रंगलेल्या विरुष्काच्या प्रेमाचा खेळ अन् ते पाहून स्मृती मानधनाने दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
किंगच्या खेळातही दिसला तोच रोमान्स
मोठ्या धावंसख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीनं अगदी अँकरची भूमिका बजावली. गत हंगामातही विराट कोहलीनं कोलकाता विरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद ५९ धावांची खेळी केली होती. यंदाच्या मोहिमेची सुरुवातही त्याने नाबाद अर्धशतकासह केली. या सामन्यात त्याने ३८ चेंडूत नाबाद ६९ धावा कुटल्या. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मागील पाच सामन्यात त्याने एका शतकासह दोन अर्धशतके झळकावली आहेत.
Web Summary : Virat Kohli's explosive T20 comeback led RCB to a record victory. Post-match, Virat and Anushka shared a loving moment with flying kisses, captivating fans. Smriti Mandhana's reaction to the couple's public display of affection also went viral.
Web Summary : विराट कोहली की टी20 में धमाकेदार वापसी से आरसीबी ने रिकॉर्ड जीत हासिल की। मैच के बाद, विराट और अनुष्का ने फ्लाइंग किस के साथ प्यार बांटा, जिसने प्रशंसकों को मोहित कर लिया। स्मृति मंधाना की प्रतिक्रिया भी वायरल हुई।