बुधवारी अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या आयपीएल २०२६ च्या १४ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर शेवटच्या चेंडूवर १ धावेने थरारक विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिलवर स्लो ओव्हर रेटमुळे १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा पहिला गुन्हा असल्याने केवळ दंडावर निभावले आहे. मात्र, दुसऱ्यांदा हा गुन्हा घडल्यास दंडाची रक्कम वाढते आणि तिसऱ्या वेळी कर्णधारावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होऊ शकते.
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, निर्धारित वेळेत षटकं पूर्ण न केल्यामुळे गुजरात टायटन्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गुजरात टायटन्सचा या हंगामातील हा स्लो ओव्हर रेटचा पहिलाच गुन्हा असल्याने, आयपीएलच्या आचारसंहितेनुसार (कलम २.२२) कर्णधार शुभमन गिलला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या मोसमात दंडात्मक कारवाई झालेला गिल हा दुसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी श्रेयस अय्यरला देखील अशाच प्रकारे दंड सोसावा लागला होता.
गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१० धावांचा डोंगर उभा केला होता. यात स्वतः शुभमन गिलने ७० धावांची (४५ चेंडू) शानदार खेळी केली, तर जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतके झळकावून त्याला साथ दिली. २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने ९२ धावांची जबरदस्त खेळी केली. डेव्हिड मिलरने शेवटच्या षटकांत फटकेबाजी करून सामना दिल्लीच्या बाजूने झुकवला. मात्र, संघाला शेवटच्या दोन चेंडूंवर विजयासाठी २ धावांची गरज असताना, मिलरने धाव घेण्यास नकार दिला. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी २ धावा हव्या असताना कुलदीप यादव धावबाद झाला. हा सामना गुजरातने एका धावेने जिंकला.
Web Summary : Gujarat Titans captain Shubman Gill was fined ₹12 lakh for a slow over rate during their IPL 2026 match against Delhi Capitals. This is his first offense; repeated violations will lead to harsher penalties.
Web Summary : गुजरात टाइटन्स के कप्तान शुभमन गिल पर दिल्ली कैपिटल्स के खिलाफ आईपीएल 2026 मैच के दौरान धीमी ओवर गति के लिए ₹12 लाख का जुर्माना लगाया गया। यह उनका पहला अपराध है; बार-बार उल्लंघन करने पर कड़ी सजा मिलेगी।