IPL 2026 Shahrukh Khan KKR Release Most Expensive Ahead Of IPL 2026 Auction Purse Remaining : आयपीएलच्या मिनी लिलावाआधी खेळाडूंना रिटेन-रिलीज करण्याच्या खेळात शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने तगड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत सगळ्यात मोठा डाव खेळला आहे. मेगा लिलावात २३.७५ कोटींच्या प्राइज टॅगसह 'ब्लॉकबस्टर' कमाई करणाऱ्या व्यंकटेश अय्यरसह १२ हंगामापासून संघाचा भाग असलेल्या कॅरेबियन दिग्गज मसल पॉवर रसेल याला KKR नं रिलीज केलं आहे. गत हंगामात आंद्र रसेल १२ कोटींसह KKR कडून खेळताना दिसला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोठ्या प्राइज टॅगच्या खेळाडूंना केलं रिलीज! KKR च्या पर्समध्ये शिल्लक राहिली सर्वाधिक रक्कम
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने व्यंकटेश अय्यर आणि आंद्र रसेल यांच्याशिवाय १० खेळाडूंना नारळ दिला आहे. यात एनरिक नॉर्टजे, चेतन साकरिया, लव्हनीथ सिसोदिया, मोईन अली, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाझ, स्पेंसर जॉन्सन आणि मयंक मार्कंडे (मुंबई इंडियन्सकडे ट्रेड) यांचा समावेश आहे. या खेळाडूंना रिलीज केल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या पर्समध्ये मिनी लिलावात खेळाडू करण्यासाठी ६४ कोटी ३० लाख एवढी मोठी रक्कम शिल्लक राहिली आहे.
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
मिनी लिलावात मोठा डाव खेळण्यासाठी हात आखडण्याचा प्रश्नच नाही उरला
रिटेन रिलीजच्या खेळानंतर कोणत्याही फ्रँचायझीकडे शिल्लक असलेली सर्वाधिक रक्कम ही KKR च्या पर्समध्ये आहे. त्यामुळे मिनी लिलावात मोठा डाव लावण्यासाठी त्यांना हात आखडता घ्यावा लागणार नाही. मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ १३ खेळाडूंवर बोली लावत मजबूत संघ बांधणी करण्याच्या इराद्याने मिनी लिलावात उतरेल. यात त्यांना ६ परदेशी खेळाडूंवर बोली लावायची आहे. मनात आणल तर ते आंद्रे रसेलसह व्यंकटेश अय्यर यांना पुन्हा आपल्या ताफ्यात घेऊ शकतात.