क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंडियन प्रीमिअर लीगचा आगामी हंगाम नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही स्पर्धा २६ मार्चपासून सुरू होणार होती, मात्र आता ती २८ मार्च २०२६ पासून सुरू होण्याची चिन्हे आहेत.
आयपीएल प्रशासनाने यापूर्वी १५ डिसेंबर २०२५ रोजी सर्व फ्रँचायझींना २६ मार्च ही तारीख कळवली होती. मात्र, अंतर्गत स्तरावर झालेल्या निर्णयानुसार आता स्पर्धेचा श्रीगणेशा २८ मार्चला होईल आणि अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी खेळवला जाईल.
विधानसभा निवडणुकांचा फटका?
वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होण्यामागे राजकीय कारण असल्याचे समजते. आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. या राज्यांमध्ये आयपीएलचे महत्त्वाचे सामने होणार असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव निवडणूक आयोगाच्या तारखांची प्रतीक्षा केली जात आहे.
पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची पुढच्या आठवड्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुकीच्या तारखांचा आढावा घेऊन संपूर्ण वेळापत्रकावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतरच अधिकृतरीत्या सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा केली जाईल.
Web Summary : IPL 2026 may start two days late, on March 28th, due to upcoming state elections. The schedule awaits election dates in Assam, West Bengal, and Tamil Nadu for security reasons. Final dates will be decided next week.
Web Summary : आईपीएल 2026 राज्य चुनावों के कारण 28 मार्च से शुरू हो सकता है। सुरक्षा कारणों से असम, पश्चिम बंगाल और तमिलनाडु में चुनाव तिथियों का इंतजार है। अंतिम तिथियां अगले सप्ताह तय की जाएंगी।