IPL 2026 Schedule RCB vs SRH on March 28 MI meet KKR : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील वेळापत्रक समोर आले आहे. २८ मार्चपासून जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीनं आयपीएलच्या १९ व्या हंगामाची सुरुवात होईल. बंगलुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा उद्घाटनचा सामना खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ (Mumbai Indians) यंदाच्या हंगामातील पहिला सामना कोलकाता विरुद्ध खेळणार असून या दोन्ही संघातील सामना २९ मार्चला वानखेडेच्या मैदानात खेळताना दिसणार येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स आपल्या मोहिमेची सुरुवात राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढतीनं करणार आहे. हा सामनाही एकदम खास ठरेल. कारण आतापर्यंत राजस्थान संघाचे नेतृत्व करणारा संजू यावेळी चेन्नईच्या ताफ्यातून आपल्या जुन्या संघाविरुद्ध खेळताना दिसेल.
देशातील काही राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर IPL च्या यंदाच्या हंगामातील वेळापत्रक हे दोन टप्प्यात जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रक समोर येण्याआधी बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच, पहिल्या २० सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यावर उर्वरित स्पर्धेतील सामने कधी अन् कुठं रंगणार ते जाहीर करण्यात येणार आहे.
IPL 2026 च्या हंगामातील पहिल्या २० सामन्याचे सविस्तर वेळापत्रक
- २८ मार्च २०२६, शनिवार: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद — बेंगळुरू
- २९ मार्च २०२६, रविवार: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स — मुंबई
- ३० मार्च २०२६, सोमवार: राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स — गुवाहाटी
- ३१ मार्च २०२६, मंगळवार: पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स — मुल्लांपूर
- १ एप्रिल २०२६, बुधवार: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स — लखनौ
- २ एप्रिल २०२६, गुरुवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद — कोलकाता
- ३ एप्रिल २०२६, शुक्रवार: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स — चेन्नई
- ४ एप्रिल २०२६, शनिवार: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स — दिल्ली
- ४ एप्रिल २०२६, शनिवार: गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स — अहमदाबाद
- ५ एप्रिल २०२६, रविवार: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स — हैदराबाद
- ५ एप्रिल २०२६, रविवार: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स — बेंगळुरू
- ६ एप्रिल २०२६, सोमवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स — कोलकाता
- ७ एप्रिल २०२६, मंगळवार: राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स — गुवाहाटी
- ८ एप्रिल २०२६, बुधवार: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स — दिल्ली
- ९ एप्रिल २०२६, गुरुवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स — कोलकाता
- १० एप्रिल २०२६, शुक्रवार: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू — गुवाहाटी
- ११ एप्रिल २०२६, शनिवार: पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद — मुल्लांपूर
- ११ एप्रिल २०२६, शनिवार: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स — चेन्नई
- १२ एप्रिल २०२६, रविवार: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स — लखनौ
- १२ एप्रिल २०२६, रविवार: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू — मुंबई
Web Summary : IPL 2026 starts March 28th with RCB facing SRH in Bengaluru. Mumbai Indians play KKR on March 29th. CSK begins against Rajasthan Royals. The schedule includes matches across various cities like Lucknow, Kolkata, and Delhi.
Web Summary : आईपीएल 2026 28 मार्च से शुरू होगा, जिसमें आरसीबी का मुकाबला बेंगलुरु में एसआरएच से होगा। मुंबई इंडियंस 29 मार्च को केकेआर से खेलेगी। सीएसके राजस्थान रॉयल्स के खिलाफ शुरुआत करेगी। शेड्यूल में लखनऊ, कोलकाता और दिल्ली जैसे विभिन्न शहरों के मैच शामिल हैं।