Sanjiv Goenka's Emotional Reaction As Rishabh Pant Leads LSG To Thrilling Win vs SRH : रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने घरच्या मैदानात सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघाची संघ मालकीण काव्या मारन हिच्यासोबत स्माईल देताना दिसलेले LSG चे संघ मालक संजीव गोयंका सामना संपल्यावर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. रिषभ पंतने खणखणीत चौकार मारताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामुळे LSG संघ मालकाची दुसरी बाजू समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जो संघ मालक कठोर स्वभावामुळे चर्चेत असायचा त्याचं मवाळ रूप दिसलं
लखनौचा संघ ज्या ज्या वेळी मैदानात उतरतो त्या त्या वेळी संजीव गोएंका संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियम स्टँडवर दिसतात. संघाच्या पराभवानंतर ते कर्णधारावर भडकल्याचेही काही क्षण पाहायला मिळाले आहे. पैसा मोजला असला तरी आपल्या संघाच्या कर्णधाराला भरमैदानात झापणं अयोग्य आहे, अशा प्रतिक्रियाही त्यांच्या कृत्यानंतर उमटल्याचे पाहायला मिळाले. पण सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर या IPL मधील कठोर मालकाचं मवाळ रूपाची झलकही दिसून आली.
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
आधी काव्या मारनसोबत स्माईल, रिषभ पंतचा विजयी चौकारानंतर संजीव गोयंका भावूक
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान अनेकदा सजीव गोयंका यांची खास झलक कॅमेऱ्यात कैद झाली. गोलंदाजांनी सर्वोत्तम सुरुवात करून दिल्यावर ते देवाचे आभार मानताना दिसले. मॅच दरम्यान लखनौ फ्रँचायझीच्या अधिकृत सोशल मीडियावरून संजीव गोयंका आणि सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन यांचा एक खास फोटो शेअर करण्यात आला. या फोटोत स्माईल देणारे गोयंका रिषभ पंतने मारलेला विजयी चौकारानंतर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
कर्णधार रिषभ पंतनं दमदार खेळीसह संपवली मॅच
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं तर, पहिल्या सामन्यातील पराभवानंतर लखनौच्या संघाने गोलंदाजी आणि फलंदाजीत धमक दाखवत दमदार कमबॅक केले. गोलंदाजीत मोहम्मद शमी चमकल्यावर धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात IPL मधील सर्वात महागडा खेळाडू (२७ कोटी) आणि LSG चा कर्णधार रिषभ पंत याने नाबाद ६८ धावांची खेळी केली. ही संघासाठी सकारात्मक गोष्ट आहे.