Kane Williamson LSG Strategic Advisor IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी डिसेंबरमध्ये होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासंदर्भात चर्चा रंगत असताना संजीव गोएंका यांच्या मालकीच्या लखनौ सुपर जाएंट्स संघानं एक मोठा डाव खेळला आहे. आगामी स्पर्धेसाठी होणाऱ्या आयपील लिलावाआधी LSG च्या संघाने न्यूझीलंड क्रिकेटर आणि IPL मध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसलेल्या केन विल्यमसनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. पण यावेळी त्याच्यावरील जबाबदारी मात्र वेगळी असणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केन विल्यमसनची LSG च्या ताफ्यात एन्ट्री, आगामी हंगामात त्याच्यावर असेल मोठी जबाबदारी
लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने २०२६ च्या हंगामासाठी केन विल्यमसन याची रणनीती सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. याचा अर्थ संघाला विजयी पथावर आणण्यासाठी तो योजना आखण्याचं काम करताना दिसेल. लखनौच्या संघातून झहीर खान बाहेर पडल्यावर संघाने शांत स्वभावाच्या केन विल्यमसन याला आपल्यासोबत जोडले आहे.
Mohammed Shami Over Hat Trick : रणजी मॅचमध्ये शमीचा जलवा; 'ओव्हर हॅटट्रिक'सह आगरकरांना कडक रिप्लाय
न्यूझीलंडच्या क्रिकेटरचं खुद्द संघ मालक संजीव गोएंका यांनी केलं स्वागत
लखनौ सुपर जाएंट्स संघाचे मालक संजीव गोएंका यांनी सोशल मीडियावरील एक्स अकाउंटवरुन खास ट्विट करत केन विल्यमसनचे स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. केन विल्यमसन लखनौ सुपर जाएंट्स संघाचा भाग राहिला आहे. LSG च्या रणनीती सल्लागारच्या रुपात संघात त्याचे स्वागत आहे. आगामी हंगामात त्याच्याकडून संघाला बहुमूल्य मार्गदर्शन मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
रागीट मालक अन् कूल रणनीतीकार!
लखनौ सुपर जाएंट्स संघाचे मालक संजीव गोएंका या IPL मॅच दरम्यान अँग्री मॅनचा अवतार पाहायला मिळाला आहे. लोकेश राहुल आणि गोएंका यांच्यात भर मैदानात घडलेला प्रकार चांगलाच चर्चेत राहिला. २०२५ च्या हंगामात ज्याच्यावर विक्रमी बोली लावली त्या रिषभ पंतवरही ते रागावल्याचे दिसून आले होते. झहीर खान यानेही करार अर्ध्यावर मोडत संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रागीट मालक आणि शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा केन विल्यमसन यांची जोडी जमणार का? ते पाहण्याजोगे असेल.