आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन दुखापतीमुळे या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला. मात्र, संघ व्यवस्थापनाने विलंब न लावता त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली असून, श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू दसुन शनाकाला संघात सामील करून घेतले आहे.
सॅम करनच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राजस्थान रॉयल्सने अनुभवी दसुन शनाकावर विश्वास दाखवला आहे. फ्रँचायझीने त्याला २ कोटी रुपयांच्या (अंदाजे २० दशलक्ष डॉलर्स) करारासह संघात सामील केले आहे. संघाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने हा एक धोरणात्मक निर्णय मानला जात आहे. दसुन शनाका हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठे नाव आहे. त्याच्याकडे तिन्ही फॉरमॅटचा दांडगा अनुभव असल्याचा आकडेवारीतून स्पष्ट होते.
दसुन शनाकाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप प्रभावी राहिली आहे. त्याने श्रीलंकेसाठी ६ कसोटी, ७१ एकदिवसीय आणि १३१ टी-२० सामने खेळले आहेत. या काळात त्याने ३ हजार ३५० हून अधिक धावा केल्या आहेत आणि ८६ विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामुळे तो एक विश्वासार्ह अष्टपैलू खेळाडू बनला आहे. आयपीएल अनुभवाबद्दल बोलायचे झाल्यास, शनाका यापूर्वी गुजरात टायटन्सकडून खेळला आहे, ज्यामुळे त्याला लीगच्या परिस्थितीचा चांगला अनुभव आहे. दरम्यान, आयपीएल २०२६ मध्ये दशुन शनाका संघासाठी किती प्रभावी ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
राजस्थान रॉयल्स संघ:
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, क्वेना म्फाका, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, लुआन-ड्रे-प्रिटोरियस, डोनोव्हान फरेरा, संदीप शर्मा, युधवीर चरक, रवींद्र जडेजा, दशुन शनाका.