IPL 2026 RR's Sam Curran Likely Miss Tournament :आयपीएल २०२६ स्पर्धेतील यंदाच्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ ३० मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या लढतीनं आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्याआधी संघाला मोठा धक्का बसला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
CSK तून RR चा झालेला स्टार अष्टपैलून स्पर्धेला मुकणार?
चेन्नई सुपरकिंग्सच्या ताफ्यातून ट्रेडच्या माध्यमातून राजस्थान रॉयल्स संघात आलेला इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन ग्रोइन इंज्युरीमुळे स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, हा स्टार संपूर्ण हंगामाला मुकण्याची शक्यता आहे.
IPL मधून 'हे' ५ दिग्गज संघ का गायब झाले? एक तर विजेता..., पुण्याचे दोन संघ होते, वाचा रंजक इतिहास
सॅम करन पहिल्यांदाच RR च्या संघाकडून उतरणार होता मैदानात
सॅम करन हा ५ मार्चला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळताना दिसला होता. पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यासारख्या संघाकडून खेळणाऱ्या या इंग्लिश खेळाडूला आयपीएलमधील चांगला अनुभव आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये बॅटिंग-बॉलिंगसह सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. यंदाच्या हंगामात तो राजस्थानच्या संघाकडून पदार्पण करणार होता. पण आता दुखापतीमुळे त्याच्या स्पर्धेतील सहभाग अनिश्चित झाला आहे.
बदली खेळाडूचा शोध
संजू सॅमसनच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने सॅम करन आणि रवींद्र जडेजा या दोघांना ट्रेड डीलच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्सच्या संघातून आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. त्याच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सच्या संघात रवींद्र जडेजा आणि डोनोवान फरेरा यांच्या रुपात दोन अष्टपैलून खेळाडू आहेत. फरेराला राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली कॅपिटल्सकडून १ कोटी मूळ किंमतीसह ट्रेड केलं होते. आता राजस्थान रॉयल्सच्या संघाला सॅम करनच्या जागी बदली खेळाडूचा शोध घ्यावा लागणार आहे.
सॅम करनची IPL मधील कामगिरी
सॅम करन आयपीएलच्य्या ६ हंगामात खेळला असून त्याच्या खात्यात ९९७ धावा आणि ५९ विकेट्स जमा आहेत. २०२१ मध्ये तो IPL विजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. यंदाच्या हंगामात राजस्थानचा संघ रियान परागच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून सॅम करनच्या बदली खेळाडूच्या रुपात ते कोणता डाव खेळणार ते पाहण्याजोगे असेल.
राजस्थान रॉयल्स संघाचे सामने
- ३० मार्च २०२६ - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, गुवाहाटी
- ४ एप्रिल २०२६ - राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजराज टायटन्स, अहमदाबाद
- ७ एप्रिल २०२६ - राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, गुवाहाटी
- १० एप्रिल २०२६ - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुवाहाटी