IPL 2026 RR vs RCB Virat Kohli Clean Bowled By Ravi Bishnoi : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पहिल्या चेंडूवर पहिली विकेट गमावल्यावर विराट कोहलीने संघाचा डाव सावरणारी खेळी केली. स्टार बॅटरनं आपल्या बॅटिंगमधील क्लास दाखवत ७ खणखणीत चौकारासह संघाचा डाव सावरण्यात पुढाकार घेतला. तो सेट झाला असताना रवी बिश्नोई गोलंदाजीला आला अन् त्याने किंग कोहलीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले. जादूई चेंडू टाकत बिश्नोईनं विराट कोहलीला क्लीन बोल्ड करत आपले खाते उघडले. विराट कोहलीनं १६ चेंडूत २०० च्या स्ट्राईक रेटनं ३२ धावा केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् रवी बिश्नोईचा जादूई चेंडूवर फसला विराट
रॉयल चॅलेंजर्सच्या संघाने तिसऱ्या षटकात ४५ धावांत फिल सॉल्टसह देवदत्त पडिक्कलच्या रुपात दोन विकेट्स गमावल्या होत्या. संघ अडचणीत असताना आरसीबीच्या चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर खिळल्या होत्या. पण पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर धावफलकावर ५८ धावा असताना चेंडूची गती कमी करून रवी बिश्नोईनं किंग कोहलीच्या रुपात संघाला मोठे यश मिळवून दिले. क्लीन बोल्ड झाल्यावर विराट कोहलीची रिॲक्शन बघण्याजोगी होती. जादूई चेंडूवर विकेट गमावल्यावर तो आवाक् झाल्याचे पाहायला मिळाले. हा क्षण बिश्नोईच्या गोलंदाजीतील ताकद दाखवून देणारा होता.
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
दुसऱ्यांदा केली किंग कोहलीची शिकार
गत हंगामात LSG च्या ताफ्यातून खेळताना दिसलेला रवी बिश्नोई संघ बदलासोबत गोलंदाजीत कमालीचा बदल करून यंदाचा हंगाम गाजवताना दिसतोय. राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळताना प्रत्येक सामन्यात विकेटची हमीसह त्याने पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. सातव्या डावात ४४ चेंडूत ३७ धावा खर्च करत दुसऱ्यांदा त्याने विराट कोहलीची शिकार केल्याचे पाहायला मिळाले.
Web Summary : In RR vs RCB, Kohli scored 32 off 16 before Bishnoi's delivery clean bowled him. Bishnoi, playing for RR, claimed Kohli's wicket for the second time in his IPL career, showcasing improved form and securing the purple cap.
Web Summary : आरआर बनाम आरसीबी में, कोहली ने 16 गेंदों में 32 रन बनाए, लेकिन बिश्नोई की गेंद ने उन्हें क्लीन बोल्ड कर दिया। आरआर के लिए खेलते हुए, बिश्नोई ने अपने आईपीएल करियर में दूसरी बार कोहली का विकेट लिया, जिससे बेहतर फॉर्म का प्रदर्शन हुआ और पर्पल कैप हासिल हुई।