RR vs RCB : रजत पाटीदारचा 'धुरंधर' अवतार! किंमत कमी झालेल्या पठ्ठ्यानंही दाखवली हिंमत अन् ...

अवघ्या ९४ धावांवर RCB नं गमावल्या होत्या ६ विकेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 22:56 IST2026-04-10T22:55:47+5:302026-04-10T22:56:57+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 RR vs RCB Score 201 Runs Rajat Patidar Venkatesh Iyer Shine Royal Challengers Bengaluru Set 202 Target Rajasthan Royals | RR vs RCB : रजत पाटीदारचा 'धुरंधर' अवतार! किंमत कमी झालेल्या पठ्ठ्यानंही दाखवली हिंमत अन् ...

RR vs RCB : रजत पाटीदारचा 'धुरंधर' अवतार! किंमत कमी झालेल्या पठ्ठ्यानंही दाखवली हिंमत अन् ...

Royal Challengers Bengaluru vs Rajasthan Royals : गुवाहटीच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना संघ अडचणीत सापडल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदारनं धमाकेदार अर्धशतक झळकावले. त्याचा 'धुरंधर' अवतार आणि IPL मध्ये किंमत कमी झालेल्या व्यंकटेश अय्यरनं इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मिळालेल्या संधीनंतर दाखवलेली हिंमतीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने १०० धावांच्या आत ६ विकेट्स गमावल्यावर राजस्थान रॉयल्ससविरुद्धची लढाई २०० पार धावसंख्येची केली. आरसीबीच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात २०१ धावा करत राजस्थानसमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवल्याचे पाहायला मिळाले.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अवघ्या ९४ धावांवर RCB नं गमावल्या होत्या ६ विकेट्स

गुवाहाटीच्या बारासपारा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चने आपल्या पहिल्या दोन षटकात फिल सॉल्ट आणि देवदत्त पडिक्कलच्या रुपात RCB च्या संघाला धक्क्यावर धक्के दिले.  किंग कोहली १६ चेंडूत ३२ धावा करून परतल्यावर बढती मिळालेल्या क्रुणाल पांड्या आणि जितेश शर्मा दोघेही स्वस्तात आटोपले. आरसीबीच्यासंघाने ९४ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. 

RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)

रजत पाटीदारचा 'धुरंधर' अवतार, किंमत कमी झालेल्या व्यंकटेश अय्यरही चमकला

संघ अडचणीत असताना रजत पाटीदार याने ४० चेंडूत ६३ धावांची धमाकेदार खेळी केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले. इम्पॅक्ट प्लेयररच्या रुपात संधी मिळालेल्या व्यंकटेश अय्यरनं १५ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २९ धावांची दमदार खेळी करत संघाच्या धावफलकावर २०० पेक्षा अधिक धावा लावणारी खेळी केली. व्यंकटेश  अय्यर हा आयपीएलमधील महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. गत हंगामात २३.२५ कोटी रुपये मोजले होते. पण तो सपशेल अपयशी ठरला. मिनी लिलावाआधी KKR नं त्याला नारळ दिल्यावर RCB च्या संघाने ७ कोटीसह त्याला आपल्या संघात समाली करून घेतले. किंमत कमी झालेल्या या पठ्ठ्याला संधी मिळाली अन् त्याने हिंमत दाखवत यंदाच्या हंगामात धमाका करण्यासाठी तयार असल्याचे दाखवून दिले.

Web Title : पाटीदार की तूफानी बल्लेबाजी, अय्यर के साहस से राजस्थान के खिलाफ RCB का शानदार प्रदर्शन

Web Summary : शुरुआती विकेट गिरने के बाद रजत पाटीदार के विस्फोटक अर्धशतक और वेंकटेश अय्यर की साहसिक पारी ने RCB को संभाला। उन्होंने राजस्थान रॉयल्स के खिलाफ RCB को 201/8 तक पहुंचाया। पाटीदार की बल्लेबाजी और अय्यर का हौसला बैंगलोर के लिए महत्वपूर्ण साबित हुआ।

Web Title : Patidar's Powerful Hitting, Iyer's Courage Lift RCB Against Rajasthan

Web Summary : Rajat Patidar's explosive fifty and Venkatesh Iyer's brave innings rescued RCB after early wickets. They propelled RCB to 201/8 against Rajasthan Royals. Patidar's hitting and Iyer's resilience proved crucial for Bangalore.