Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघावर ओढावली पहिल्या पराभवाची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 00:05 IST

Open in App

IPL 2026 RR vs RCB Rajasthan Royals Won By 6 Wkts Against Royal Challengers Bengaluru : गुवाहटीच्या मैदानात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं प्रमुख गोलंदाजांची केलेली धुलाई आणि ध्रुव जुरेल याच्या दमदार खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघाने यंदाच्या हंगामातील सलग चौथा विजय नोंदवला. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघावर पहिल्या पराभवाची नामुष्की ओढावली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आधी वैभव सूर्यवंशीचा धमाका, मग ध्रुव जुरेलचा जलवा

पहिल्यांदा फलंदाजी करताना अवघ्या ९४ धावांवर ६ विकेट्स गमावल्यावर रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यरच्या दमदार खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात २०१ धावा करत राजस्थान रॉयल्सच्या संघासमोर २०२ धावांचे टार्गेट सेट केले होते.  या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीनं पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. यंदाच्या हंगामातील दुसरे अर्धशतक झळकावत त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या  गोलंदाजांचे खांदे पाडले. त्याने आपली जबाबदारी अगदी चोख बजावल्यावर ध्रुव जुरेल याने शानदार अर्धशतक झळकावत रवींद्र जडेजाच्या साथीनं संघाचा विजय निश्चित केला.  

RR vs RCB : रजत पाटीदारचा 'धुरंधर' अवतार! किंमत कमी झालेल्या पठ्ठ्यानंही दाखवली हिंमत अन् ...

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई आणि  ब्रिजेश शर्मा यांनी कमालीची गोलंदाजी करत तगडी फलंदाजी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची अवस्था ६ बाद ९४ अशी बिक केली. संघ अडचणीत असताना आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने ४० चेंडूत ६३ धावांची दमदार खेळी साकारली. अखेरच्या षटकात रोमारियो शेफर्ड याने ११ चेंडूत केलेल्या २२ धावा आणि व्यंकटेश अय्यरनं १५ चेंडूत २९ धावांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने निर्धारित २० षटकात २०१ धावा केल्या होत्या. 

वैभव सूर्यवंशी ध्रुव जुरेलची शतकी भागीदारी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दिलेल्या २०२ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या संघाची सुरुवात खराब झाली. दमदार फॉर्ममध्ये असलेला यशस्वी जैस्वाल संघाच्या धावफलकावर २१ धावा असताना माघारी फिरला. त्याने ८ चेंडूत १३ धावा केल्या. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी फक्त ३७ चेंडूत १०८ धावांची भागीदारी रचली. यात वैभव सूर्यवंशीनं २२ चेंडूत ७० धावा केल्या.

क्रुणाल पांड्यानं ट्विस्ट आणलं, पण शेवटी RCB चा संघ RR ला रोखायला कमी पडला

क्रुणाल पांड्यानं खेळीला ब्रेक लावण्याआधी त्याने २६ चेंडूत ७८ धावांची धमाकेदार खेळी साकारली. त्याची जागा घेण्यासाठी आलेला शिमरॉन हेटमायर आल्या पावली माघारी फिरला. कर्णधार रियान परागही ५ चेंडूत ३ धावांवर बाद झाला. पण ध्रुव जुरेल शेवटपर्यंत थाबंला. त्याने ४३ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजा २५ चेंडूत २४ धावांवर नाबाद राहिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajasthan Royals' majestic win; Dhruv Jurel shines! RCB's first defeat.

Web Summary : Rajasthan Royals defeated Royal Challengers Bangalore by 6 wickets, fueled by Vaibhav Suryavanshi's explosive batting and Dhruv Jurel's solid innings. RCB faced their first defeat despite Patidar and Venkatesh Iyer's efforts.
टॅग्स :आयपीएल २०२६