वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी

पॉवर प्लेमध्ये वैभव सूर्यवंशीचा पॉवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 23:05 IST2026-04-10T23:00:56+5:302026-04-10T23:05:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 RR vs RCB Rajasthan Royals 15 Year Old Vaibhav Suryavanshi Smashed 15 Ball 50 Against Royal Challengers Bengaluru | वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी

वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी

RR Star Vaibhav Suryavanshi Record 2nd Fifty vs RCB :  गुवाहटच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची आणखी एक धमाकेदार खेळी पाहायला मिळाले. २०२ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालच्या रुपात पहिली विकेट गमावल्यावरही पॉवर प्लेमध्ये वैभव सूर्यवंशीचा आक्रमक अंदाज कमी झाला नाही. त्याने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर चौकारासह खाते उघडणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं १५ चेंडूत यंदाच्या हंगामातील दुसरे अर्धशतक झळकावले. या खेळी दरम्यान त्याने दुखापतीतून सावरून RCB च्या ताफ्यात सामील झालेल्या जोश हेजलवूडचीही धुलाई केली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

दुसरे अर्धशतक, यंदाच्या हंगामातील पहिल्या शतकाची होती संधी, पण...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल ८ चेंडूत  १३ धावा करून परतला. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सची जोडी अवघ्या २१ धावांवर फुटली. पण त्यानंतर वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा चौकार षटकारांसह आपल्या फलंदाजीचा खास नजराणा पेश केला. १५ चेंडूत अर्धशतक झळकावल्यावर त्याने आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला. याआधी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यातही त्याने १५ चेंडूत शतक साजरे केले होते. दुसरे अर्धशतक शतकामध्ये रुपांतरित करण्याची संधी त्याच्याकडे होती. पण क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला.  

Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला

३०० च्या स्ट्राईक रेटनं कुटल्या ७८ धावा'; ऑरेंज कॅपवरही केला कब्जा

वैभव सूर्यवंशी याने २६ चेंडूत ३०० च्या स्ट्राईक रेटनं ७८ धावांची खेळी केली. या खेळीसह दोन अर्धशकाच्या जोरावर त्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आपलाच जोडीदार यशस्वी जैस्वाल याला मागे टाकत ऑरेंज कॅपही पटकावली आहे. या स्फोटक खेळीत वैभव सूर्यवंशी याने ८ चौकार आणि ७ षटकार मारले. यंदाच्या हंगामात सर्वाधिक १८ षटकार त्याच्या नावे आहेत.

Web Title : वैभव सूर्यवंशी का धमाका, 15 गेंदों में अर्धशतक, गेंदबाजों की धुलाई!

Web Summary : 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी ने RCB के खिलाफ तूफानी पारी खेली, मात्र 15 गेंदों में अर्धशतक जड़ा। उन्होंने भुवनेश्वर कुमार और जोश हेजलवुड को निशाना बनाया, और शुरुआती विकेट गिरने के बाद भी आक्रामक अंदाज जारी रखा।

Web Title : Vaibhav Suryavanshi Smashes Fifty in 15 Balls, Dominates RCB Bowlers

Web Summary : 15-year-old Vaibhav Suryavanshi showcased another explosive innings against RCB, smashing a fifty in just 15 balls. He aggressively targeted Bhuvneshwar Kumar and Josh Hazlewood, continuing his dominant form after an early wicket fell.