Vaibhav Suryavanshi And Bhuvneshwar Kumar Stats RR vs RCB IPL Match : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात गुवाहटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर IPL मधील १६ वा सामना रंगणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि स्विंगचा किंग भुवनेश्वर कुमार यांच्यातील टक्कर पाहण्याजोगी असेल. आतापर्यंतच्या सामन्यात वैभव सूर्यंवशी हा सातत्याने RR च्या संघाला दमदार सुरुवात करून देताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला RCB कडून भुवीही कमालीच्या फॉर्ममध्ये आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभव सूर्यवंशीसमोर असेल भुवीचं चॅलेंज
IPL च्या गत हंगामात भुवनेश्वर कुमार आणि वैभव सूर्यवंशी एका सामन्यात समोरासमोर आले होता. भुवीच्या १० चेंडूंचा सामना करताना वैभवनं २ षटकाराच्या मदतीने १५ धावा काढल्या. पण दोन षटकार मारल्यावर भुवीनं त्याला कमालीच्या इनस्विंगवर बोल्ड केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे गुवाहटीच्या मैदानात या दोघांच्यातील बॅटल बघण्याजोगी असेल.
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
कोण ठरणार भारी?
भुवनेश्वर कुमार हा आयपीएलच्या इतिहासातील पॉवर प्लेमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत पहिल्या ६ षटकात ८० पेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे वैभव सूर्यवंशी हा सातत्याने आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत आहे. या दोघांमध्ये कोण कुणावर भारी पडणार? RCB चा संघ विजयाच्या हॅटट्रिक नोंदवणार की, राजस्थानचा संघ विजयी चौकार मारत आपला रॉयल अंदाज पुन्हा दाखवून देणार ते पाहण्याजोगे असेल.
वैभव सूर्यवंशीसह भुवीची यंदाच्या हगामातील कामगिरी
वैभव सूर्यवंशीनं पहिल्या दोन सामन्यात एका अर्धशतकाच्या मदतीने ४०.६७ च्या सरासरीसह १० चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने १२२ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत १५ वर्षीय बॅटर सातव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक षटकार माऱणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो समीर रिझवीसह संयुक्तरित्या अव्वलस्थानावर आहे. भुवीनं पहिल्या दोन सामन्यात ४८ धावा खर्च करत ४ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीतील आपली दावेदारी भक्कम करणारा स्पेल टाकण्यासाठी तो जार लावताना दिसेल.