Join us
Daily Top 2Weekly Top 5

RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)

काही कळण्याआधी आल्या पावली माघारी फिरला सॉल्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 21:23 IST

Open in App

IPL 2026 RR vs RCB Jofra Archer Strikes To Remove Phil Salt First Ball : गुवाहटीच्या बारसापारा मैदानात नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान परागनं पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरनं पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर सॉलिड बाउन्सर मारत फिल सॉल्टच्या रुपात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिला धक्का देत संघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली. या षटकातील अखेरच्या चेंडूवर विराट कोहलीवरही 'गोल्डन डक'ची नामुष्की ओढावली असती. पण तो स्ट्राईकवर आल्यावर RR च्या संघाने स्लिप हटवली अन् विराट कोहलीच्या बॅटची कड घेऊन निर्माण झालेली झेलची संधी हुकली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

काही कळण्याआधी आल्या पावली माघारी फिरला सॉल्ट

नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीची वेळ आल्यावर फिल सॉल्ट आणि विराट कोहली जोडीनं आरसीबीच्या संघाची सुरुवात केली. दुसऱ्या बाजूनं रियान परागनं चेंडू प्राइम गोलंदाज जोफ्राच्या हाती दिला. त्याने पहिल्याच चेंडूवर ताशी १४२ पेक्षा अधिक वेगाने  जबरदस्त बाउन्सर मारला. सॉल्टनं चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. पण टप्पा पडल्यावर चेंडू इतक्या वेगाने आला की, बॅटची कड घेऊन  चेंडू हवेत उडाला. काही कळण्याआधी RCB च्या सलामीवीराला आपल्या पावली माघारी फिरावे लागले. 

LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री

फिल सॉल्टवर तिसऱ्यांदा ओढावली ही वेळ

स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या फिल सॉल्टवर आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा पहिल्या चेंडूवर आउट होण्याची वेळ आली. या यादीत पार्थिव पटेल सर्वात आघाडीवर आहे. तो चार वेळा पहिल्या चेंडूवर बाद झाला आहे. ड्वेन स्मीत, पृथ्वी शॉ आणि केएल राहुल हे बॅटर प्रत्येकी ३ वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याचा रेकॉर्ड आहे.

दुसऱ्या षटकात दुसरी विकेट

पहिली विकेट गमावल्यावर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल जोडीनं कडक फटकेबाजी केली. पण त्यानंतर जोफ्रा पुन्हा गोलंदाजीला आला. तीन चौकार खाल्ल्यावर दमदार कमबॅक करताना त्याने देवदत्त पडिक्कलच्या खेळीलाही ब्रेक लावला. चौथ्या डावात पडिक्कल याने दुसऱ्यांदा जोफ्राच्या गोलंदाजीवर विकेट फेकली.

English
हिंदी सारांश
Web Title : Archer's bouncer dismisses Salt, RR dominates RCB early in IPL.

Web Summary : Jofra Archer's early bouncer dismissed Phil Salt, giving Rajasthan Royals a strong start against Royal Challengers Bangalore. Archer nearly got Kohli out on a golden duck. Later, Archer dismissed Padikkal after conceding three fours. Salt faced his third IPL duck.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्सजोफ्रा आर्चर