कोण आहे Kartik Sharma? १९ वर्षीय अनकॅप्ड खेळाडूला MS धोनीच्या जागी मिळाली पदार्पणाची संधी; पण...

मिनी लिवात मेगा बोली! IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 20:52 IST2026-03-30T20:49:29+5:302026-03-30T20:52:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 RR vs CSK Who Is Kartik Sharma 19 Year Old Wicket Keeper Batter Debut CSK Replace MS Dhoni In IPL 2026 Most Expensive Uncapped Player In Auction History | कोण आहे Kartik Sharma? १९ वर्षीय अनकॅप्ड खेळाडूला MS धोनीच्या जागी मिळाली पदार्पणाची संधी; पण...

कोण आहे Kartik Sharma? १९ वर्षीय अनकॅप्ड खेळाडूला MS धोनीच्या जागी मिळाली पदार्पणाची संधी; पण...

Who Is Kartik Sharma 19 Year Old Wicket Keeper Batter Debut For CSK : आयपीएल २०२६ च्या हंगामातील सलामीच्या सामन्यात डॅडीज आर्मी यंगिस्तानच्या रुपात मैदानात उतरली आहे. यंदाच्या मोहिमेला सुरुवात करण्याआधी ऑयकॉन महेंद्रसिंह धोनीच्या रुपात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला मोठा धक्का बसला होता. दुखापतीमुळे धोनी सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे.  त्याच्या जागी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने सलामीच्या सामन्यात १९ वर्षीय कार्तिक शर्माला पदार्पणाची संधी दिली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कोण आहे कार्तिक शर्मा?

कार्तिक शर्माचा जन्म २६ एप्रिल २००६ मध्ये राजस्थानच्या भरतपूर येथे झाला. युवा विकेट किपर बॅटरनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी करुन क्रिकेट जगताचे लक्ष आपल्याकडे वेधले. उजव्या हाताच्या विकेटकिपर बॅटरनं रणजी करंडक स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात उत्तराखंड विरुद्ध शतक झळकावले होते. कमी वयात या गड्याने मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज असल्याचे सिद्ध केले.  

IPL 2026 : MS धोनीच्या निवृत्ती आधी CSK वर 'ही' वेळ येईल असे वाटत नव्हते, पण...

मिनी लिवात मेगा बोली! IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू 

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने २०२५ मध्ये झालेल्या मिनी लिलावात या युवा खेळाडूसाठी १४.२० कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतलं होते. आयपीएलच्या इतिहासातील तो संयुक्तरित्या सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू आहे. याच प्राइज टॅगसह चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने युवा गोलंदाज प्रशांत वीर यालाही आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. तोही यंदाच्या हंगामात पदार्पण करेल, असे वाटत होते. कारण सलामीच्या लढतीत त्याला इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात ठेवण्यात आले होते. गोलंदाजीवेळी तोही पदार्पणाची संधी देण्याचा डाव CSK नं खेळला. पण विकेट्स लवकर पडल्यामुळे सरफराजला यलो जर्सीत पदार्पणाची संधी मिळाली. 

१४.२० कोटींच्या युवा बॅटरवर भारी पडला ३० लाखांत पदार्पणाचा सामना खेळणारा गोलंदाज

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची अवस्था खूपच बिकट होती. अर्धा संघ तंबूत परतल्यावर कार्तिक शर्मा हा संघाकडून दुहेरी आकडा गाठणार पहिली फलंदाज ठरला. पण १८ धावांवर त्याच्या पदार्पणातील सामन्यातील खेळीला ब्रेक लागला. राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून ३० लाख या मूळ प्राइज टॅगसह पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या ब्रिजेश शर्मा याने १४.२० कोटींच्या गड्याची विकेट घेतली.

Web Title : कार्तिक शर्मा: अनकैप्ड खिलाड़ी धोनी की जगह, पदार्पण का अवसर, लेकिन संघर्ष

Web Summary : धोनी की चोट के कारण युवा कार्तिक शर्मा ने सीएसके के लिए पदार्पण किया। भारी रकम में खरीदे गए, उन्होंने घरेलू क्रिकेट में वादा दिखाया। हालांकि, उन्होंने अपने पहले आईपीएल मैच में संघर्ष किया, और एक पदार्पण करने वाले गेंदबाज द्वारा आउट होने से पहले केवल 18 रन बनाए।

Web Title : Kartik Sharma: Uncapped player replaces Dhoni, debut opportunity, but struggles

Web Summary : Young Kartik Sharma debuted for CSK due to Dhoni's injury. Acquired for a hefty sum, he showed promise in domestic cricket. However, he struggled in his first IPL match, scoring just 18 runs before being dismissed by a debutant bowler.