IPL 2026 : MS धोनीच्या निवृत्ती आधी CSK वर 'ही' वेळ येईल असे वाटत नव्हते, पण...

नेमकं असं काय घडलं? धोनीशिवाय याआधी CSK संघ कधी मैदानात उतरला होता? जाणून घेऊयात सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 20:04 IST2026-03-30T20:01:46+5:302026-03-30T20:04:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 RR vs CSK This Will Be Chennai Super Kings First Ever Game After 277 Matches Without Both MS Dhoni And Suresh Raina Record Won Only Once Out Of Five | IPL 2026 : MS धोनीच्या निवृत्ती आधी CSK वर 'ही' वेळ येईल असे वाटत नव्हते, पण...

IPL 2026 : MS धोनीच्या निवृत्ती आधी CSK वर 'ही' वेळ येईल असे वाटत नव्हते, पण...

आयपीएल २०२६ च्या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील यंदाच्या हंगामातील तिसरा सामना गुवाहटीच्या बरसापरा मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा संघ महेंद्रसिंह धोनीशिवाय मैदानात उतरला. दुखापतीमुळे MS धोनी सुरुवातीच्या सामन्याला मुकणार हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे यंदाच्या सलामीच्या लढतीत CSK पहिल्यांदाच अशी वेळ आली जी किमान धोनीच्या निवृत्तीपर्यंत अपेक्षित नव्हती. नेमकं असं काय घडलं? धोनीशिवाय याआधी CSK संघ कधी मैदानात उतरला होता? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

CSK वर पहिल्यांदाच आली ही वेळ

चेन्नईस सुपर किंग्सचा संघ  पहिल्यांदाच MS धोनी, रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांच्याशिवाय मैदानात उतरला आहे. रवींद्र जडेजा यंदाच्या हंगामाआधी ट्रेड डिलच्या माध्यमातून राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात सामील झाला होता. २०१९ मध्ये सुरेश रैनानं आयपीएलमधून निवृत्ती घेतली. या जोडीनं चेन्नईची साथ सोडल्यावर धोनी अजूनही संघाचा भाग आहे. पण तो दुखापतीमुळे बाहेर पडला अन् त्याच्या निवृत्तीआधीच CSK च्या संघावर या त्रिकुटाशिवाय मैदानात उतरण्याची वेळ आली. २७७ सामन्यानंतर CSK चा संघ धोनी आणि रैनाशिवाय मैदानात उतरला आहे. 

११ व्या वर्षी घर सोडलं! Angkrish Raghuvanshi च्या मुंबई ते कोलकाता प्रवासातील प्रेरणादायी गोष्ट

याआधी २०१९ च्या हंगामात MS धोनीशिवाय मैदानात उतरली होती CSK अन्...

चेन्नई सुपर किंग्सचा संघ याआधी २०१९ च्या हंगामात महेंद्रसिंह धोनीशिवाय मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. या हंगामात पाठीच्या दुखापतीमुळे धोनी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्याला मुकला होता. हे दोन्ही सामने चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने गमावले होते. 

MS धोनीच्या अनुपस्थितीत CSK नं फक्त एक सामना जिंकला

MS धोनी हा टीम इंडियासह आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्सचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. पाच पैकी फक्त एकदाच MS धोनीच्या नेतृत्वाखाली CSK नं विजय नोंदवला आहे. 
 

  • vs दिल्ली डेअरडेविल्स, दिल्ली २०१० -विजय 
  • vs किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई २०१०-पराभव 
  • vs रॉयल चॅलेंजर्स, बंगळुरू २०१०- पराभव 
  • vs सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद २०१९ -पराभव 
  • vs मुंबई इंडियन्स, चेन्नई २०१९- पराभव 

Web Title : आईपीएल 2026: धोनी, रैना, जडेजा के बिना सीएसके; संन्यास से पहले अप्रत्याशित।

Web Summary : पहली बार, सीएसके धोनी, रैना और जडेजा के बिना खेली। धोनी की चोट ने उन्हें बाहर कर दिया, जो उनकी अपेक्षित सेवानिवृत्ति से पहले पहली बार हुआ। 2019 में धोनी की पीठ में चोट के कारण अनुपस्थित रहने पर सीएसके दोनों गेम हार गई। धोनी के बिना खेले गए पांच मैचों में से सीएसके ने केवल एक जीता है।

Web Title : IPL 2026: CSK without Dhoni, Raina, Jadeja; unexpected before retirement.

Web Summary : For the first time, CSK played without Dhoni, Raina, and Jadeja. Injury sidelined Dhoni, a first before his anticipated retirement. CSK lost both games in 2019 when Dhoni was absent due to a back injury. CSK has won only one of the five games played without Dhoni.