इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामात रवींद्र जडेजा पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून मैदानात उतरला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत त्याने आपल्यातील धमक दाखवली. फलंदाजीत अर्धशतक किंवा शतक झळकावल्यावर 'तलवारबाजी' सेलिब्रेशन करणाऱ्या जड्डूनं यावेळी विकेट घेतल्यावर 'गनमॅन' होऊन आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
CSK ला धक्क्यावर धक्के, त्यात जड्डूनं वाढवलं टेन्शन
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सची खराब अतिशय बिकट झाली. राजस्थानच्या संघातून मेगा डीलसह चेन्नईच्या ताफ्यात गेलेला संजू सॅमसनसह कर्णधार ऋतुराजलाही आपल्या फलंदाजीतील धमक दाखता आली नाही. चेन्नई सुपर किंग्सच्या डावातील आठव्या षटकात रियान पराग याने अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजाच्या हाती चेंडू सोपवला.
कोण आहे Kartik Sharma? १९ वर्षीय अनकॅप्ड खेळाडूला MS धोनीच्या जागी मिळाली पदार्पणाची संधी; पण...
जड्डूनं विकेटनंतर आक्रमक अंदाजात केलं सेलिब्रेशन, इथं पाहा व्हिडिओ
रवींद्र जडेजाने आपल्या पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर सरफराज खानला तंबूत धाडत दमदार सुरुवात केली. ५१ धावांवर अर्धा संघ तंबूत परतला असताना शिवम दुबे मैदानात आला. त्याने जड्डूच्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. पण पुढच्याच चेंडूवर जड्डूनं त्याला आपल्या जाळ्यात अडकलले. ही विकेट घेतल्यावर त्याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
जड्डूनं शिवम दुबेवर राग काढला की, CSK वर?
रवींद्र जडेजा हा राजस्थान रॉयल्सकडून रॉकस्टार झाला. IPL मध्ये त्याने याच संघाकडून पदार्पण केले होते. पण मागील काही हंगामापासून तो CSK चा प्रमुख खेळाडू होता. पण यंदाच्या हंगामाआधी संजूसाठी झालेल्या मेगा डीलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने त्याला घरवापसीचा रस्ता दाखवला. या कनेक्शनमुळेच विकेट घेतल्यावर जड्डूनं षटकार मारणाऱ्या शिवम दुबेवर राग काढला की, CSK वर असा प्रश्नही चर्चेचा विषय ठरतोय.
CSK चा फलंदाजीत फ्लॉप शो!
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून फलंदाजीत फ्लॉप शो पाहायला मिळाला. जेमी ओव्हर्टनच्या ३६ चेंडूतील ४३ धावांची खेळीसह कार्तिक शर्मा १८ (१५) आणि सरफराज खान १७ (१२) या तिघांशिवाय अन्य कोणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी चेन्नई सुपर किंग्सचा संघ १९.४ षटकात १२७ धावांवर आटोपला.
Web Summary : Ravindra Jadeja, playing for Rajasthan Royals, stunned CSK with a dominant performance. Taking two wickets and celebrating aggressively, he sparked debate: was it anger at Shivam Dube or CSK itself? CSK's batting flopped, folding for 127.
Web Summary : राजस्थान रॉयल्स के लिए खेलते हुए रवींद्र जडेजा ने शानदार प्रदर्शन से CSK को चौंका दिया। दो विकेट लेकर आक्रामक अंदाज में जश्न मनाया, जिससे बहस छिड़ गई: क्या यह शिवम दुबे या CSK पर गुस्सा था? CSK की बल्लेबाजी फ्लॉप रही, 127 पर सिमट गई।