Join us
Daily Top 2Weekly Top 5

RR vs CSK: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा धमाका! पहिल्या चेंडूपासून तुटून पडला; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी

चौकारासह खाते उघडलं; षटकार मारत साजरी केलं अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 22:19 IST

Open in App

राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने नव्या हंगामाची सुरुवातही एकदम धमाकेदार अंदाजात केली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील मॅट हेन्रीच्या पहिल्याच चेंडूवर त्याने मोठा फटका खेळला. या चेंडूवर झेलची एक संधी निर्माण झाली होती, पण CSK च्या क्षेत्ररक्षकांना त्याचा फायदा घेता आला नाही. परिणामी  वैभव सूर्यवंशीच्या नावे चौकाराची नोंद झाली. हाच आक्रमक अंदाज कायम ठेवत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने बॅक टू बॅक षटकार मारत १५ चेंडूत अर्धशतक साजरे केले. राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले.

वैभव सूर्यवंशी ही खेळी आणखी मोठी करेल, असे वाटत असताना अंशुल कंबोज याने त्याच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. सरफराज खान याने उत्तम झेल घेत युवा बॅटरला तंबूचा रस्ता दाखवला.  त्याआधी युवा बॅटरनं बिनधास्त अंदाजातील फटकेबाजीसह मैफील लुटत सामना संघाच्या बाजूनं सेट केला होता.  त्याने या सामन्यात ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली.  

राजस्थानकडून सर्वात जलद अर्धशतकाचा रेकॉर्ड

राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम हा यशस्वी जैस्वालच्या नावे आहे. २०२३ च्या हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अवघ्या १३ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.  या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीचं नाव दिसते. गत हंगामात  जलद शतकी खेळीचा विक्रम नोंदवताना त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक साजरे केले होते. या यादीत जोस बटलर १८ चेंडूतील अर्धशतकासह चौथ्या क्रमांकावर आहे. आणि चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीचं नाव आहे. 

यशस्वी जैस्वालसोबत दमदार भागीदारी

चेन्नई सुपर किंग्सनं ठेवलेल्या १२८ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालच्या साथीनं वैभव सूर्यवंशीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३८ चेंडूत ७५ धावांची भागीदारी रचली. 

English
हिंदी सारांश
Web Title : RR vs CSK: Vaibhav Suryavanshi slams fifty in 15 balls!

Web Summary : Rajasthan Royals' Vaibhav Suryavanshi started the season explosively against CSK. He aggressively struck a four off the first ball and then smashed a quickfire fifty in just 15 balls, showcasing his attacking prowess.
टॅग्स :आयपीएल २०२६राजस्थान रॉयल्सवैभव सूर्यवंशीचेन्नई सुपर किंग्स