सलामीच्या सामन्यात RCB नं दोघांना दिली पदार्पणाची संधी! महागडा खेळाडू बाकावर; SRH ची पहिली बॅटिंग

जोश हेजलवूड संघाला जॉईन झाला असला तरी तो पहिल्या सामन्याला मुकणार हे आधीच स्पष्ट झाले होते. त्याच्या जागी RCB च्या संघाने न्यूझीलंडच्या जेकब डफी याला पदार्पणाची संधी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:28 IST2026-03-28T19:26:35+5:302026-03-28T19:28:23+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Royal Challengers Bengaluru Opt To Bowl Against Sunrisers Hyderabad Jacob Duffy Abhinandan Singh First IPL Match | सलामीच्या सामन्यात RCB नं दोघांना दिली पदार्पणाची संधी! महागडा खेळाडू बाकावर; SRH ची पहिली बॅटिंग

सलामीच्या सामन्यात RCB नं दोघांना दिली पदार्पणाची संधी! महागडा खेळाडू बाकावर; SRH ची पहिली बॅटिंग

IPL 2026, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad, 1st Match : गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीनं आयपीएलच्या १९ व्या हंगामाची सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गत चॅम्पियन आरसीबीच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रजत पाटीदार याने नाणेफेकीनंतर यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी उत्सुक आहोत, असे सांगितले. यावेळी त्याने दोन खेळाडू पहिल्यांदा आयपीएल खेळणार असल्याची पुष्टीही केली. 

 

RCB च्या संघाकडून दोघांना IPL पदार्पणाची संधी; IPL च्या इतिहासातील महागडा खेळाडू बाकावरच

जोश हेजलवूड संघाला जॉईन झाला असला तरी तो पहिल्या सामन्याला मुकणार हे आधीच स्पष्ट झाले होते. त्याच्या जागी RCB च्या संघाने न्यूझीलंडच्या जेकब डफी याला पदार्पणाची संधी दिली आहे. याशिवाय अनकॅप्ड भारतीय मध्यम जलगती गोलंदाज अभिनंद सिंग हा देखील आयपीएलमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यंदाच्या हंगामात IPL मधील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असलेला व्यंकटेश अय्यर ७ कोटींसह RCB च्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. पण सलामीच्या सामन्यात त्याला बाकावरच बसवण्यात आले आहे. २०२५ च्या हंगामात व्यंकटेश अय्यर २३.७५ कोटींसह केकेआरकडून खेळताना दिसला होता. तो आयपीएलच्या इतिहासातील भारताचा तिसरा आणि एकंदरीत पाचवा सर्वात महागडा खेळाडू आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  प्लेइंग इलेव्हन

विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी, सुयश शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन 

अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड, ईशान किशन (कर्णधार /यष्टीरक्षक), हेन्री क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा.
 

Web Title : RCB ने दो को मौका दिया, महंगा खिलाड़ी बाहर; SRH की बल्लेबाजी

Web Summary : RCB ने पहले गेंदबाजी चुनी, जैकब डफी और अभिनंदन सिंह का पदार्पण। महंगे वेंकटेश अय्यर बाहर बैठे। SRH की बल्लेबाजी लाइनअप में हेड और किशन शामिल हैं।

Web Title : RCB Debuts Two, Expensive Player Benched; SRH Bat First

Web Summary : RCB chose to bowl first, debuting Jacob Duffy and Abhinandan Singh. Million-dollar Venkatesh Iyer sits out. SRH's batting lineup includes Head and Kishan.