Rinku Singh: आयपीएल २०२६ आधी केकेआरनं खेळला मोठा डाव; रिंकू सिंगवर सोपवली मोठी जबाबदारी!

IPL 2026: आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 21:21 IST2026-03-24T21:20:19+5:302026-03-24T21:21:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026: Rinku Singh Elevated to Vice-Captaincy by Kolkata Knight Riders | Rinku Singh: आयपीएल २०२६ आधी केकेआरनं खेळला मोठा डाव; रिंकू सिंगवर सोपवली मोठी जबाबदारी!

Rinku Singh: आयपीएल २०२६ आधी केकेआरनं खेळला मोठा डाव; रिंकू सिंगवर सोपवली मोठी जबाबदारी!

आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली. केकेआरचा स्टार फलंदाज आणि चाहत्यांचा लाडका खेळाडू रिंकू सिंग याच्यावर फ्रँचायझीने मोठी जबाबदारी सोपवली असून, आगामी हंगामासाठी त्याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

केकेआरच्या एका विशेष कार्यक्रमादरम्यान केकेआरने ही अधिकृत घोषणा केली. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे देखील रिंकूच्या या नवीन भूमिकेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. रिंकू सिंग हा २०१८ पासून केकेआरच्या संघाचा भाग आहे. गेल्या काही वर्षांत त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने संघाला अनेक अशक्य वाटणारे विजय मिळवून दिले. २८ वर्षीय रिंकूने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील कामगिरीने केवळ धावाच केल्या नाहीत, तर आपल्यातील नेतृत्वगुणही सिद्ध केले आहेत. 

केकेआरचे सीईओ व्हेंक म्हैसूर यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त करताना सांगितले की, "रिंकू २०१८ पासून आमच्याशी जोडलेला आहे. तो संघाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देताना आम्हाला अभिमान वाटत आहे. हा निर्णय संघाच्या दीर्घकालीन नियोजनाचा एक भाग असून तरुण खेळाडूंना भविष्यातील नेतृत्वासाठी तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे."

आयपीएल २०२६ मध्ये अनुभवी अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करणार असून, आता रिंकू सिंग त्याला रणनीती आखण्यात आणि मैदानावरील निर्णयांमध्ये मदत करेल. केकेआरने या हंगामासाठी एक संतुलित संघ मैदानात उतरवला असून रिंकूची ही नवी भूमिका संघासाठी 'गेम-चेंजर' ठरू शकते.  

आयपीएल २०२६: कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमनदीप सिंह, रिंकू सिंह (उपकर्णधार), रोव्हमॅन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोडा, वरुण चक्रवर्ती, कैमरून ग्रीन, फिन ऐलन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, आकाश दीप, ब्लेसिंग मुजरबानी.

Web Title : रिंकू सिंह आईपीएल 2026 से पहले केकेआर के उप-कप्तान बने।

Web Summary : कोलकाता नाइट राइडर्स ने रिंकू सिंह को आईपीएल 2026 के लिए उप-कप्तान नियुक्त किया। फ्रेंचाइजी ने एक विशेष कार्यक्रम के दौरान इसकी घोषणा की। 2018 से केकेआर के साथ रिंकू ने नेतृत्व क्षमता और आक्रामक बल्लेबाजी का प्रदर्शन किया है। अजिंक्य रहाणे टीम की कप्तानी करेंगे। केकेआर का लक्ष्य इस निर्णय के माध्यम से युवा नेताओं को विकसित करना है।

Web Title : Rinku Singh named KKR vice-captain ahead of IPL 2026.

Web Summary : Kolkata Knight Riders appointed Rinku Singh as vice-captain for IPL 2026. The franchise announced this during a special event. Rinku, with KKR since 2018, has demonstrated leadership qualities and aggressive batting. Ajinkya Rahane will captain the team. KKR aims to develop young leaders through this decision.