IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 

Rinku Singh Create History: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकू सिंहने आयपीएलमध्ये इतिहास घडवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:02 IST2026-04-03T16:00:22+5:302026-04-03T16:02:53+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026: Rinku Singh created history in IPL, leaving star cricketers behind! | IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 

IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकू सिंहने आयपीएलमध्ये इतिहास घडवला आहे. आयपीएलमध्ये केकेआरच्या संघाकडून खेळताना त्याने सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूचा मान मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अनिकेत वर्माचा झेल घेतल्यानंतर त्याने हा पराक्रम केला आहे. रिंकूने केकेआरकडून खेळताना आतापर्यंत एकूण ४१ झेल घेतले आहेत. या कामगिरीसह त्याने स्टार आलराउंडर आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि मनोज तिवारी यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि केकेआर यांच्यात गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात रिंकू सिंहने इशान किशनचा आणि अनिकेत वर्माला झेल घेऊन आंद्रे रसेलचा विक्रम मोडला. आंद्रे रसेलने केकेसाठी एकूण ४० झेल घेतले आहेत. त्यानंतर या यादीत सुनील नारायण दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने केकेआरसाठी एकूण ३६ झेल घेतले आहेत. तर, मनोज तिवारीने केकेआरसाठी एकूण ३० झेल घेतले आहेत.  रिंकू सिंग आतापर्यंत फक्त कोलकाता नाईट रायडर्सकडूनच खेळला आहे. त्याने कोलकाता संघासाठी ६० सामन्यांमध्ये १ हजार १३२ धावा केल्या असून, त्याचा एकूण स्ट्राइक रेट १४५.५० आहे.

केकेआरसाठी सर्वाधिक झेल:

खेळाडूचे नावएकूण झेल
रिंकू सिंग४१
आंद्रे रसेल४०
सुनील नरेन३६
मनोज तिवारी३०

आयपीएल: एकाच संघासाठी सर्वाधिक झेल

आयपीएलमध्ये एकाच संघासाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने ११७ झेल घेतले आहेत. त्यानंतर या यादीत मुंबई इंडियन्स माजी क्रिकेटपटू किरॉन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याने २०१० ते २०२२ दरम्यान मुंबईकडून खेळताना १०३ झेल घेतले आहेत.

Web Title : रिंकू सिंह ने रचा आईपीएल इतिहास, रसेल को पीछे छोड़ा।

Web Summary : रिंकू सिंह ने केकेआर के लिए सबसे ज़्यादा कैच (41) लेकर आईपीएल में इतिहास रचा, आंद्रे रसेल को पछाड़ा। उन्होंने यह उपलब्धि सनराइजर्स हैदराबाद के खिलाफ मैच में हासिल की। विराट कोहली के पास RCB के लिए 117 कैचों के साथ आईपीएल का रिकॉर्ड है।

Web Title : Rinku Singh makes IPL history, surpasses Russell in catches for KKR.

Web Summary : Rinku Singh set an IPL record for KKR, taking the most catches (41), surpassing Andre Russell. He achieved this feat in the match against Sunrisers Hyderabad. Virat Kohli holds the overall IPL record with 117 catches for RCB.