Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशान किशनचं शतक हुकलं; अनिकेतच्या पॉवर शोच्या जोरावर SRH नं द्विशतक ठोकलं; RCB समोर २०२ धावांचे टार्गेट

याआधी आरसीबीच्या संघाने घरच्या मैदानात फक्त एकदाच २०० पारची लढाई जिंकली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 21:37 IST

Open in App

आयपीएल २०२६ च्या हंगामातील सलामीच्या लढतीत आघाडीच्या फळीतील फलंदाजी कोलमडल्यावर ईशान किशन पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना शानदार खेळी साकारली. अखेरच्या षटकात अनिकेत शर्माच्या पॉवर शोच्या जोरावर सनरायझर्सं हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद २०१ धावा करत गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स संघासमोर २०२ धावांचे टार्गेट सेट केले आहे. आरसीबीच्या संघाने घरच्या मैदानात फक्त एकदाच २०० पारची लढाई जिंकली आहे त्यामुळे सलामीच्या लढतीत ते दुसऱ्यांदा हा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पॉवरप्लेमध्येच SRH च्या तिघांनी धरला तंबूचा रस्ता

रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर जेकब डफी याने पदार्पणाच्या सामन्यात कमालीची गोलंदाजी करताना पॉवर प्लेमध्येच सनरायझर्स हैदराबादच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले. धावफलकावर अवघ्या १८ धावा असताना अभिषेक शर्मा ८ चेंडूत ७ धावा करुन माघारी फिरला. त्याच्यापाठोपाठ ट्रॅविस हेडनं ९ चेंडूत ११ धावा करून मैदान सोडले. डफीनं नितीश कुमारला अवघ्या एका धावेवर माघारी धाडले. SRH च्या संघाने २९ धावांत पॉवर प्लेमध्ये ३ विकेट्स गमावल्या होत्या. संघ अडचणीत असताना ईशान किशन याने कर्णधाराला साजेशी खेळी करून दाखवले. 

कोण आहे Jacob Duffy? ज्यानं पदार्पणाच्या सामन्यात एकाच षटकात अभिषेकसह हेडची केली शिकार

ईशानची शानदार खेळी, क्लासेनसोबत क्लास भागीदारी 

आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर IPL मध्ये पहिल्यांदा संघाचे नेतृत्व करताना ईशान किशन याने कमालीची खेळी केली. हेन्री क्लासेनच्या साथीनं त्याने चौथ्या विकेटसाठी ५३ चेंडूत ९७ धावांची दमदार भागीदारी करत संघाचा डाव सावरला. क्लासेन २२ चेंडूत ३१ धावांवर तंबूत परतल्यावर ईशान किशन याने ३८ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदीने ८० धावांची खेळी साकारली. त्याचे शतक हुकले. 

अनिकेत वर्माची फटकेबाजी

अखेरच्या षटकात अनिकेत वर्मानं आपल्या फलंदाजीतील धमक दाखवली. त्याने १८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने केलेल्या ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद २०१ धावा केल्या. आरसीबीकडून जेकब डफी आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. याशिवाय भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग आणि सूयश शर्मा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ishan Kishan's near-century, SRH hits 200, RCB faces tough target.

Web Summary : Ishan Kishan's captaincy debut saw a near-century, boosted by Aniket Sharma's power hitting. SRH set a 202-run target for RCB after scoring 201/9. Can RCB chase it down at home?
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबादआयपीएल २०२४इशान किशनइंडियन प्रीमिअर लीग