IPL 2026 RCB vs SRH Date Time Live Cricket Streaming : आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामातील उद्धाटनाचा सामना गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, साखळी फेरीतील पहिले पाच सामने RCB चा संघ आपल्या घरच्या मैदानात खेणार असून अखेरचे दोन सामने ते रायपूरच्या मैदानात खेळणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
SRH ची तुफान फटकेबाजी RCB वर पडेल का भारी?
आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात SRH च्या संघाने तगड्या बॅटिंग लाईनअपसह मैदानात उतरत ३०० पारची चाहुल दिली. पण, गत हंगामात संघाला सातत्यपूर्ण तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करता आला नव्हता. शेवटच्या पाच साखळी सामन्यांपैकी चार सामने गमावल्यामुळे ते सहाव्या स्थानावर राहिले. याउलट RCB च्या संघाने गत हंगामात पहिली वहिली IPL ट्रॉफी जिंकली होती. प्रमुख सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे यंदाच्या हंगामात SRH चा संघ चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील. ईशान किशनही सध्या दमदार फॉर्ममध्ये असूने ते गत चॅम्पिनय RCB ला तगडी फाईट देतील, अशी अपेक्षा आहे.
IPL 2026 : पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकायला १८ वर्षे लागली! आता RCB ला खुणावतोय CSK अन् MI चा महारेकॉर्ड
सलामीच्या लढतीत कशी असेल RCB आणि SRH ची प्लेइंग इलेव्हन
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (RCB Predicted Playing XI): फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेविड, कृणाल पांड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जेकब डफी.
- सनरायझर्स हैदराबाद संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (SRH Predicted Playing XI): ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, लियाम लिविंगस्टोन, हर्षित पटेल, जयदेव उनाडकट, ब्रायडन कार्स, शिवम मावी.
आरसीबबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हेड टू हेड रेकॉर्ड
- खेळलेले सामने: २५
- आरसीबी जिंकले: ११
- एसआरएच जिंकले: १३
- अनिर्णित: १
एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी कुणला साथ देणार?
बंगळुरुचे एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येच्या लढती या मैदानात पाहायला मिळाल्या आहेत. ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्ससारख्या खेळाडूंनी या मैदानावर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आरसीबीला घरच्या मैदानावर हैदराबादची स्फोटक फलंदाजीला रोखण्याचे आव्हान असेल. आरसीबीचा संघ यंदाच्या हंगामात जोश हेजलवूडशिवाय मैदानात उतरणार आहे. यश दयाल आणि नवुन थुशाराही संघासोबत नसल्यामुळे आरसीबीची मदार ही अनुभवी भुवीवर असेल.
आरसीबी विरुद्ध एसआरएच आयपीएल २०२६ सामना लाईव्ह कुठे पाहायचा?
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याचे थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर करण्यात येणार आहे. याशिवाय जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेता येईल.
Web Summary : IPL 2026 starts with RCB vs SRH. RCB hosts the initial matches. SRH aims for improvement with strong batting. Watch live on Star Sports and Jio Hotstar.
Web Summary : IPL 2026 की शुरुआत RCB बनाम SRH से। RCB शुरुआती मैचों की मेजबानी करेगा। SRH मजबूत बल्लेबाजी के साथ सुधार का लक्ष्य रखेगा। स्टार स्पोर्ट्स और जियो हॉटस्टार पर लाइव देखें।