Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : बॅटल ऑफ आयपीएल क्वीन्स! SRH च्या काव्या मारनसमोर RCB च्या नव्या मालकीणीनं लुटली मैफील

RCB संघाला चीअर करतानाचा व्हिडिओ शेअर करत या नव्या चेहऱ्याने सर्वांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 20:43 IST

Open in App

IPL 2026 RCB vs SRH Ananya Birla vs Kavya Maran : बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियवर गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीनं आयपीएलच्या १९ व्या हंगामाला सुरुवात झाली. सनरायझर्स हैदराबादचा संघ मैदानात उतरला की, या फ्रँचायझी संघाची मालकीण काव्या मारन लक्षवेधी ठरते. पण यावेळी आरसीबीच्या नव्या मालकीणीनं सर्वांच लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

RCB च्या नव्या सह मालकीणीची हवा

आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्याआधी आदित्य बिर्ला समूहाच्या नेतृत्वाखाली कन्सोर्टियमने जवळपास १६६०० कोटी रुपये मोजत RCB चा संघ विकत घेतला. या विक्रमी डीलनंतर आदित्य बिर्ला समूहाचा भाग असलेला चेहरा अनन्या बिर्ला चर्चेत आली होती. सलामीच्या सामन्यातही ती संघाला चीअर करण्यासाठी बंगळुरुच्या स्टँडमध्ये पोहचल्याचे पाहायला मिळाले. इन्स्टाग्रामच्या अकाउंटवरून RCB संघाला चीअर करतानाचा व्हिडिओ शेअर करत या नव्या चेहऱ्याने सर्वांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.

सलामीच्या सामन्यात RCB नं दोघांना दिली पदार्पणाची संधी! महागडा खेळाडू बाकावर; SRH ची पहिली बॅटिंग

कोण आहे अनन्या बिर्ला ?

अनन्या बिर्ला (Ananya Birla) ही आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांची कन्या आहे. वयाच्या १७ व्या वर्षी उद्योजिका बनलेला हा चेहरा बिर्ला समूहाच्या वेगवेगळ्या व्यवसायात डायरेक्टरच्या पदावर सक्रीय आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉप सिंगरच्या रुपातही तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

काव्या मारनचा चेहरा पडला!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार रजत पाटीदार याने सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पदार्पणाचा IPL सामना खेळणाऱ्या जेकब डफी याने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत आघाडीच्या स्फोटक फलंदाजांना तंबूत धाडले. संघाची खराब सुरुवात झाल्यामुळे SRH संघाची मालकीण काव्या मारनचा चेहरा पडल्याचेही पाहायला मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Ananya Birla steals the show from Kavya Maran.

Web Summary : IPL 2026 began with RCB vs SRH. While Kavya Maran often grabs attention, RCB's new co-owner Ananya Birla stole the spotlight, cheering for her team. Kumar Mangalam Birla's daughter is an entrepreneur and pop singer.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबादकाव्या मारन