IPL 2026 Bhuvneshwar Kumar Record : भारताचा अनुभवी जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला आहे. रॉयल चॅलेंजर्स संघाकडून मैदान गाजवत असलेल्या या पठ्ठ्यानं चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात पहिली विकेट आपल्या खात्यावर जमा करताच IPL मध्ये २०० विकेट्स पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे. एकंदरीत विचार केला तर IPL मध्ये २०० विकेट्सचा डाव साधणारा तो दुसरा खेळाडू आहे. याआधी फिरकीपटू युझवेंद्र चहल याने हा पल्ला गाठला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयुष म्हात्रेच्या रुपात २०० वी शिकार
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने निर्धारित २० षटकात २५० धावा करत चेन्नई सुपर किंग्ससमोर २५१ धावांचे विक्रमी टार्गेट सेट केले. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई संघाची सुरुवात खराब झाली. चेन्नईच्या डावातील दुसऱ्या षटकात भुवी आपलं पहिले षटक घेऊन आला. याच षटकात त्याने आयुष म्हात्रेची विकेट घेत २०० विकेट्सचा डाव साधला.भुवनेश्वर कुमारने भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो सातव्या स्थानावर आहे. आरसीबीशिवाय भुवीनं IPL मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया आणि सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधीत्व केले आहे.
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- युझवेंद्र चहल १७६ सामन्यात २२४ विकेट्स
- भुवनेश्वर कुमार -१९२ सामन्यात २०० विकेट्स
- सुनील नरेन १९१ सामन्यात १९३ विकेट्स
- पियूष चावला - १९२ सामन्यात १९२ विकेट्स
- रविचंद्रन अश्विन- २२१ सामन्यात १८७ विकेट्स
Web Summary : Bhuvneshwar Kumar achieved a milestone in IPL, becoming the first fast bowler and second overall to claim 200 wickets. He reached this feat during the match against CSK, adding another feather to his illustrious career which includes representing India and various IPL teams.
Web Summary : भुवनेश्वर कुमार ने आईपीएल में इतिहास रच दिया, वे 200 विकेट लेने वाले पहले तेज गेंदबाज और कुल मिलाकर दूसरे खिलाड़ी बन गए। उन्होंने यह उपलब्धि सीएसके के खिलाफ मैच में हासिल की, जो उनके शानदार करियर में एक और उपलब्धि है, जिसमें भारत और विभिन्न आईपीएल टीमों का प्रतिनिधित्व करना शामिल है।