आयपीएलमध्ये रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात झालेल्या लढतीत क्रिकेटप्रेमींना षटकार चौकारांचा तुफान पाऊस पाहायला मिळाला. अखेरीस या लढतीत बंगळुरूने ४३ धावांनी बाजी मारली. मात्र मैदानावर देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टीम डेव्हिड यांच्या तुफानी फटकेबाजीबरोबरच मैदानावर झालेला एक वादही क्रिकेटप्रेमींमध्ये आता चर्चेचा विषय ठरला आहे. चेन्नईचा डाव सुरू असताना ड्रिंक्स ब्रेकदरम्यान, मैदानावर बंगळुरूचे खेळाडू आणि पंचामंध्ये पाण्याच्या बाटलीवरून वादावादी झाली होती. तसेच या गोष्टीची नंतर मैदानावर आणि सोशल मीडियावरही खूप चर्चा झाली.
त्याचं झालं असं की, ड्रिंक्स ब्रेकदरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल हे पाण्याची बाटली शोधत होते. त्याचदम्यान त्यांची नजर मैदानावरील पंचांवर पडली. मैदानावरील पंच बंगळुरूच्या कर्णधारासाठी ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतून पाणी पित असल्याचे पाहताच बंगळुरूचे खेळाडू आणि प्रशिक्षक नाराज झाले. तसेच रजत पाटीदार, मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि बॅटिंग कोच दिनेश कार्तिक कमालीचे नाराज झाले.
या तिघांनीही त्वरित पंचांच्या दिशेने इशारा करत हे काय असा इशारा दिला. दरम्यान, पंचांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अन्य व्यक्तीकडे इशारा करत त्याने आपल्याला पाण्याची बाटली दिल्याचे सांगितले. त्यानंतर या वादावर पडदा पडला. मात्र ही घटना आता क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
Web Summary : During the RCB-CSK match, a dispute arose when RCB players noticed an umpire drinking from their water bottle during a drinks break. Captain and coaches expressed their displeasure, leading to a brief on-field discussion. The issue was later resolved with an explanation from the umpire.
Web Summary : RCB-CSK मैच के दौरान, RCB के खिलाड़ियों ने एक अंपायर को ड्रिंक्स ब्रेक के दौरान उनकी पानी की बोतल से पीते हुए देखा, जिससे विवाद हो गया। कप्तान और कोचों ने नाराजगी जताई, जिसके बाद मैदान पर संक्षिप्त बातचीत हुई। अंपायर के स्पष्टीकरण के बाद मामला सुलझ गया।