RCB Jercsey change, new look video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) गेल्या वर्षभरापासून मैदानावर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. गेल्या वर्षी, फ्रँचायझीने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले. दरम्यान, WPL 2026 हंगामात, RCB महिला संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यामुळे महिला संघाला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी मिळाली आहे. तशातच RCB पुरुष संघ IPL 2026 स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. जेतेपद आपल्याकडे कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. याचदरम्यान, RCB फ्रँचायझीने नवीन हंगामासाठी नवीन जर्सी लाँच केली आहे, ज्यात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
आरसीबीची नवीन जर्सी लाँच
२६ मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL 2026साठी RCB संघ पहिल्यांदाच गतविजेता संघ म्हणून स्पर्धेत उतरणार आहे. नवीन हंगामासाठी बेंगळुरूच्या संघातील बहुतांश खेळाडू कायम आहेत. पण ते सर्व खेळाडू एका नवीन लूकमध्ये दिसतील. हा नवीन लूक आरसीबीच्या नवीन जर्सीमध्ये दिसून येईल. आरसीबीने सोशल मीडिया व्हिडिओ पोस्टमध्ये त्यांच्या जर्सीचा लूक रिव्हिल केला आहे. आरसीबीचे खेळाडू यंदा त्यांची त्यांची नवी जर्सी परिधान करतील ज्यात छातीजवळ लोगोच्या वरच्या बाजूला एक सोनेरी स्टार मार्क करण्यात आला आहे. या नवीन जर्सीमध्ये आरसीबीच्या लोगोच्या वर असलेला एक स्टार म्हणजे त्यांच्या पहिल्या विजेतेपदाचे प्रतीक आहे.
-------------
दरम्यान, RCB ने गेल्या वर्षी IPLचे विजेतेपद जिंकल्यानंतर एका विजयी रॅलीचे आयोजन केले होते. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार समारंभ होणार होता आणि त्याचवेळी एक विजयी रॅली निघणार होती. पण RCBने या विजयी रॅलीबाबत पोलिसांनी आयत्यावेळी सांगितले, त्यामुळे त्यांना गर्दी नियोजनाला पुरेसा वेळ मिळाला नाही. परिणामी चेंगराचेंगरीमध्ये अनेक चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला.