CSK ला मिस करणारा किस अन् पाणावलेले डोळे! गुलाबी जर्सीत जड्डूनं अशी जपली 'येलो फॉरेव्हर'ची भावना

Ravindra Jadeja Kisses CSK Jersey: आधी आक्रमक सेलिब्रेशन; मग CSK च्या जर्सीवरील प्रेम अन् आदराची भावना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:16 IST2026-03-31T12:55:47+5:302026-03-31T13:16:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Ravindra Jadeja On Trade From CSK To RR Kissed CSK Jersey Logo During Match Video And Pics Goes Viral | CSK ला मिस करणारा किस अन् पाणावलेले डोळे! गुलाबी जर्सीत जड्डूनं अशी जपली 'येलो फॉरेव्हर'ची भावना

CSK ला मिस करणारा किस अन् पाणावलेले डोळे! गुलाबी जर्सीत जड्डूनं अशी जपली 'येलो फॉरेव्हर'ची भावना

Ravindra Jadeja Crying Video: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडू वेगगेळ्या हंगामात संघ बदलून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. यापुढेही हे चित्र दिसून येईल. पण जगातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या टी-२० लीगमध्ये  काही मोजके खेळाडू आहेत ज्यांनी अनेक वर्षे एकाच फ्रँचायझीसोबत खेळत त्या संघाच्या जर्सी आणि चाहत्यांसोबत एक अनोख नातं निर्माण केले आहे. त्यातील एक नाव म्हणजे रवींद्र जडेजा.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गुलाबी जर्सीतही येलो फॉरेव्हरचा फिव्हर 

यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून उतरलेला जड्डू मागील १२-१३ वर्षी CSK चा चेहरा होता. पण ट्रेड डीलमुळे त्याचा संघ बदला अन् तो पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात गेला. त्यामुळेच आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील गुवाहटीच्या मैदानातील सामन्यात रवींद्र जडेजा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला त्याने रॉकस्टार अशी ओळख देणाऱ्या संघाची जर्सी पुन्हा परिधान केली. पण गुलाबी जर्सीतही त्याने येलो फॉरेव्हरचा फिव्हर दाखवून दिला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यातील हा भावूक क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  

दुहेरी डाव साधताच 'तलवारबाज' जड्डू झाला 'गनमॅन'! शिवम दुबेवर राग काढला, की CSK वर? (VIDEO)

आधी आक्रमक सेलिब्रेशन; मग CSK च्या जर्सीवरील प्रेम अन् आदराची भावना 

 गुवाहटी बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये जर्सी बदलून मैदानात उतरल्यावर रवींद्र जडेजाने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवून दिली. एकाच षटकात त्याने इम्पॅक्ट प्लेरच्या रुपात मैदानात उतरलेल्या सरफराज खानसह मॅच सेट करण्याची ताकद असलेल्या शिवम दुबेला स्वस्तात तंबूत धाडले. या विकेटनंतर त्याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याची चर्चाही रंगली. पण त्याच वेळी त्याने CSK च्या येलो जर्सीवर प्रेम आणि आदराची भावनाही जपल्याचा खास क्षण पाहायला मिळाला.  

पाणावलेले डोळे! CSK च्या जर्सीवरील लोगोला किस करत जड्डू झाला भावूक 



राजस्थान विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यात रवींद्र जडेजाने खलील अहमदच्या जर्सीवरील CSK लोगोला किस करत जुन्या संघाला मिस करतोय, ते दाखवून दिले. एवढेच नाही तर एका षटकात दोन विकेट्स घेत चेन्नई सुपर किंग्सचे कंबरडे मोडल्यावर आक्रमक सेलिब्रेशन करणारा जड्डू सीमारेषेवर पाणावलेल्या डोळ्यांसह भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून जड्डू अजूनही CSK ला विसरलेला नाही अशी चर्चा रंगताना दिसत आहे.  

मेगा ट्रेड डीलवर व्यक्त झाला जड्डू
 
सामन्यानंतर रवींद्र जडेजाने मेगा ट्रेड डीलवरही भावूक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, "सुरुवातीला थोडं कठीण होतं, कारण मी CSK साठी १२-१३ वर्षे खेळलो. त्यामुळे तो भावनिक क्षण होता. पण नंतर वाटलं की, हा प्रवासाचाच एक भाग आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे मी त्या संघात परतलो आहे, ज्याच्यासोबत मी माझं पहिलं IPL विजेतेपद जिंकलं.ठ

जडेजाचा IPL मधील प्रवास

  • २००८: राजस्थान रॉयल्ससोबत पहिलं IPL विजेतेपद
  • २०२१२-२०२५: CSK चा महत्त्वाचा खेळाडू ( CSK वर बंदीच्या काळात २ वर्षे गुजरात लायन्स)
  • २०२३: फायनलमध्ये शेवटच्या दोन चेंडूंवर चौकार-षटकार मारून CSK ला विजेतेपद
  • २०२६: ट्रेडनंतर पुन्हा राजस्थान रॉयल्समध्ये पुनरागम

Web Title : भावुक जडेजा ने चूमा CSK जर्सी को, गुलाबी में दिखाया 'येलो फॉरएवर' प्यार।

Web Summary : राजस्थान रॉयल्स में ट्रेड किए गए रवींद्र जडेजा ने मैच के दौरान CSK के प्रति अपना स्नेह दिखाया। उन्होंने CSK लोगो को चूमा और विकेट लेने के बाद आक्रामक अंदाज में जश्न मनाया, जिससे उनकी पूर्व टीम के साथ भावनात्मक संबंध का पता चलता है। ट्रेड के बावजूद, उनका दिल अभी भी चेन्नई के साथ है।

Web Title : Emotional Jadeja kisses CSK jersey, shows 'Yellow Forever' love in pink.

Web Summary : Ravindra Jadeja, traded to Rajasthan Royals, displayed his enduring affection for CSK during a match. He kissed the CSK logo and celebrated aggressively after taking wickets, showcasing his emotional connection to his former team. Despite the trade, his heart remains with Chennai.